नाशिक : भारत निवडणूक आयोगाच्या मतदार पुनरीक्षण मोहिमेंतर्गत नाशिक जिल्ह्णातील बागलाण, कळवण, दिंडोरी व इगतपुरी या चार तालुक्यांतील आदिवासी महिलांची मतदार नोंदणी करण्याकडे अधिक लक्ष केंद्रित करण्यात येणार असून, याशिवाय नवीन मतदारांची नोंदणी व मतदार यादीतील त्रुटी दूर करण्यासाठी प्रत्येक मतदान केंद्रावर पाहणीसाठी मतदार याद्या ठेवण्यात येणार आहे. १ सप्टेंबरपासून सुरू होणाऱ्या मतदार पुनरीक्षण मोहिमेची माहिती निवडणूक तहसीलदार गणेश राठोड यांनी पत्रकार परिषदेत दिली. येत्या दोन दिवसांत जिल्ह्णातील प्रत्येक विधानसभा मतदारसंघाची प्रारूप मतदार यादी प्रसिद्ध करण्यात येणार असून, सदरच्या यादी प्रत्येक तहसीलदार कार्यालयात तसेच मतदान केंद्रावर मतदारांना पाहण्यासाठी ठेवण्यात येणार आहे. मतदारांनी मतदार यादी पाहून त्यात आपले नाव असण्याबाबत खात्री करावी तसेच नाव नसल्यास फॉर्म नंबर ६ भरून तो कागदपत्रांसह संबंधित तहसील कार्यालयात जमा करावेत. या मोहिमेत प्रामुख्याने नवीन मतदारांवर लक्ष केंद्रित करण्यात येणार असून, त्यासाठी नाशिक जिल्ह्णातील ६४ कनिष्ठ महाविद्यालयांमध्ये विशेष मोहीम हाती घेण्यात येईल. या महाविद्यालयात प्रवेश घेणाºया व वयाची अठरा वर्षे पूर्ण करणाºया विद्यार्थ्यांची मतदार म्हणून नोंदणी करण्यात येणार आहे. नाशिक जिल्ह्णातील बागलाण, कळवण, दिंडोरी व इगतपुरी या चार तालुक्यांत आजवर झालेल्या सर्व प्रकारच्या निवडणुकीत आदिवासी पुरुष मतदारांच्या प्रमाणात महिला मतदारांचे प्रमाण अल्प असल्याचे दिसून आले आहे. त्यामुळे आदिवासी महिलांना या प्रवाहात आणण्यासाठी त्यांची मतदार म्हणून नोंद करण्यावर अधिक भर देण्यात येणार आहे. तशा सूचना मतदार नोंदणी अधिकाºयांना देण्यात आल्या आहेत. मतदार नोंदणीचा हा कार्यक्रम ३१ आॅक्टोबरपर्यंत चालणार असून, त्यावरील हरकती, तक्रारींची सुनावणी होऊन ४ जानेवारी २०१९ मध्ये अंतिम मतदार यादी प्रसिद्ध करण्यात येणार आहे.दिव्यांग, लष्करी जवानांची होणार नोंदणीया मोहिमेतच दिव्यांग मतदारांना त्यांचा मतदानाचा हक्क बजावता यावा यासाठी विशेष प्रयत्न करण्यात येणार आहेत. दिव्यांग मतदार नोंदणीसाठी त्यांच्यासाठी काम करणाºया स्वयंसेवी संस्था, संघटनांना पत्र देऊन दिव्यांगाची माहिती मागविण्यात आली असून, समाजकल्याण व जिल्हा रुग्णालयाकडूनही माहिती गोळा करण्यात येत आहे. जिल्हा रुग्णालयाने १८०० दिव्यांगांच्या पत्त्यासह यादी दिल्याने तिचा आधार घेण्यात येणार आहे तर देशाच्या कानाकोपºयात सेवेवर असलेल्या जिल्ह्णातील लष्करी जवानांचीही नोंदणी करण्यात येणार आहे. सध्या ६४०० जवानांची सर्व्हीस व्होटर म्हणून नोंद आहे, याशिवाय जे राहून गेले त्यांचीही नोंदणी करण्यासाठी लष्कर प्रशासनाला कळविण्यात आले आहे.
आदिवासी महिलांची मतदार नोंदणी करणार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 01, 2018 12:15 AM