येवला : आदिवासी बांधव आपल्या हक्कासाठी एकत्रित आला पाहिजे आणि खऱ्या मत्स्यव्यवसाय करणाºया बांधवांना मत्स्यमार संस्था मिळाल्या पाहिजे. आदिवासी हा नेहमी जमीन, जंगल, पाणी यांचे संरक्षण करणार आहे. तो निसर्ग पूरक असल्याने आदिवासी हक्क त्याला मिळाला पाहिजे. आमच्या आयुक्त कार्यालयाची दारे आपल्यासाठी कधीही उघडी आहे. आपला हक्क मिळवून देण्यासाठी व आपल्या योजनांचा लाभ मिळवून देण्यासाठी मी नेहमी प्रयत्नशील राहील, असे आश्वासनही प्रादेशिक उपआयुक्त एस. व्ही. साळुंके यांनी दिले. तालुक्यात प्रथमच खिर्डीसाठे येथे मत्स्यमारांसाठी संस्थेची स्थापना करण्यात आली. प्रमुख अतिथी म्हणून साळुंके बोलत होत्या.एकलव्य प्राथमिक भूजलाशयातील मत्स्यमार व्यावसायिक सहकारी संस्था मर्यादित खिर्डीसाठे संस्थेचे उद्घाटन करण्यात आले. अध्यक्षस्थानी एकलव्य संघटनेचे संस्थापक शिवाजी ढवळे होते. येथे मत्स्यसंस्था स्थापन झाल्यामुळे येथील आदिवासी बांधवांना खºया अर्थाने न्याय मिळाला असल्याचे पंचायत समिती सदस्य प्रवीण गायकवाड म्हणाले. आम्ही आदिवासी बांधव देशात फक्त लेबर उपलब्ध करण्याचे काम करत आहोत. आमचा पंजा ऊस तोडणार, ही चिंता ढवळे यांनी व्यक्त करून महाराष्ट्रातील ८० टक्के मत्स्यमार सोसायट्या या इतर समाजाच्या ताब्यात आहेत. सगळी धरणे मासेमारी करण्यासाठी मिळाली तर आदिवासी बांधवांच्या राहणीमानात, शिक्षण, सामाजिक, आर्थिक परिस्थितीत मोठा बदल होईल, असेही शिवाजीराव ढवळे म्हणाले. कार्यक्रमास राजेंद्र पिंपळे, शांताराम पवार, अरुण माळी,विलास खुरसणे, खंडू बहिरम आदींसह महिला, ग्रामस्थ व आयुक्तालयातील कर्मचारी उपस्थित होते. सूत्रसंचालन वैभव सोनवणे यांनी केले. विजय माळी, अनिता माळी यांनी आभार मानले.
आदिवासींनी हक्कासाठी एकत्रित यावे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 21, 2018 12:27 AM