इगतपुरी : ८ फेब्रुवारी हा दिवस रस्ता अपघातात मृत्युमुखी पडणार्या लोकांचा स्मृती दिन म्हणून पाळला जातो. यानिमित्ताने इगतपुरी येथील महात्मा गांधी विद्यालयात मानवी साखळीद्वारे श्रद्धांजली वाहण्यात आली. रस्त्यांवर अपघात होण्याची संख्या वाढली असून अपघातांत मृत्युमुखी पडणाऱ्या कुटुंबांची वाताहत होते आहे. यामुळे निर्माण होणाºया विविध सामाजिक प्रश्नांची निर्मिती रोखण्यासाठी शालेय विद्यार्थ्यांनी जागरूकतेने कर्तव्य पार पाडावे असे प्रतिपादन महिंद्रा इगतपुरीचे वरिष्ठ व्यवस्थापक कैलास ढोकणे यांनी केले. ह्या कार्यक्र मात बोलतांना व्यवस्थापक जयंत इंगळे म्हणाले की, शालेय जीवनापासून वाहतूक नियम, आपत्कालीन व्यवस्थापनाचे धडे विद्यार्थ्यांना मिळाल्यास अपघातांची संख्या कमी करण्यास हातभार लागेल.महिंद्राच्या अग्निशमन विभागाचे अधिकारी जयेश पाटील यांनी आपल्या चमुच्या माध्यमातून प्रात्यिक्षके विद्यार्थ्यांना दाखवले. यावेळी जयंत इंगळे, अग्निशमन अधिकारी जयेश पाटील, हरीश चौबे, योगेश सांगवीकर, शिवम गोयल, अरूण गायकवाड, विजय सोनवणे उपस्थित होते.
मानवी साखळीद्वारे रस्ते अपघातातील मृतांना श्रद्धांजली
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 08, 2019 5:56 PM