सिन्नर: नाशिक शिक्षण प्रसारक मंडळाच्या सिन्नर संकुलातील शेठ ब.ना. सारडा विद्यालय,चांडक कन्या विद्यालय व संजीवनी प्राथमिक विद्यामंदिर या शाळांत लोकमान्य बाळ गंगाधर टिळक यांना पुण्यतिथी निमित्त तर साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांना जन्मशताब्दी निमित्त सोशल डिस्टंसिंगचे पालन करीत आदरांजली वाहण्यात आली.प्रारंभी ना.शि.प्र मंडळाचे उपाध्यक्ष एम. जी.कुलकर्णी, शालेय समिती अध्यक्ष बापूसाहेब पंडित, अॅड.श्रीराम क्षत्रिय, प्राचार्य अनिल पवार, मुख्याध्यापिका सौ.माधवी पंडित, सौ. माया गोसावी, कार्यकारी मंडळ सदस्य राहुल मुळे यांचे शुभहस्ते लोकमान्य टिळक व अण्णाभाऊ साठे यांच्या प्रतिमांचे पूजन संपन्न झाले.चांडक कन्या विद्यालयातील शिक्षक कुणाल जोशी यांनी यावेळी लोकमान्य टिळक व लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांचे कार्य, यांच्या जीवनातील विविध प्रसंग तसेच या दोघांचे स्वातंत्र्य लढ्यातील योगदान याविषयी अतिशय अभ्यासपूर्ण माहिती देऊन उपस्थितांच्या मनात देशभक्तीची भावना जागृत केली.सध्या कोरणा मुळे शाळा बंद पण शिक्षण सुरू आहे .म्हणून इतर सर्व विद्यार्थ्यांपर्यंत ही या दोन महान विभूतींचे कार्य पोहोचावे म्हणून गुगल मिट च्या माध्यमातून ऑनलाइन पद्धतीने वर्गा वर्गांतून विद्यार्थ्यांनी लोकमान्य टिळक व लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या विषयी अभ्यासपूर्ण माहिती देऊन त्यांना आदरांजली वाहिली. गुगल मीट च्याच माध्यमातून वर्गातील पालक कार्यक्रमास अध्यक्ष म्हणून उपस्थित होते. विद्यालयातील सर्व वर्ग शिक्षकांनी या ऑनलाईन कार्यक्रमासाठी तीन चार दिवस आधीपासूनच विद्यार्थ्यांशी संपर्क करून ऑनलाइन माध्यमातून विद्यार्थ्यांच्या भाषणाची तयारी करून घेतली होती.या कार्यक्रमाचे औचित्य साधून शेठ ब.ना.सारडा विद्यालय व चांडक कन्या विद्यालयातील इयत्ता दहावी मध्ये यश मिळविलेल्या गुणवंत विद्यार्थ्यांचे मान्यवरांच्या शुभहस्ते गुलाब पुष्प देऊन अभिनंदन करण्यात आले.संजय वाघ यांनी सूत्रसंचालन केले.यावेळी दीपक बाकळे, राजहंस माळी, अण्णा जाधव ,अंबादास बैरागी ,मंगेश जाधव उपस्थित होते.
सिन्नर संकुलात लोकमान्य टिळक-साठे यांना आदरांजली
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 01, 2020 4:01 PM
सिन्नर: नाशिक शिक्षण प्रसारक मंडळाच्या सिन्नर संकुलातील शेठ ब.ना. सारडा विद्यालय,चांडक कन्या विद्यालय व संजीवनी प्राथमिक विद्यामंदिर या शाळांत लोकमान्य बाळ गंगाधर टिळक यांना पुण्यतिथी निमित्त तर साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांना जन्मशताब्दी निमित्त सोशल डिस्टंसिंगचे पालन करीत आदरांजली वाहण्यात आली.
ठळक मुद्दे गुणवंत विद्यार्थ्यांचे मान्यवरांच्या हस्ते अभिनंदन करण्यात आले.