पांडाणे- दिंडोरी तालुक्यातील कोल्हेर येथे अहिवंतवाडी गणाच्यावतीने पुलागामा येथील शहीद जवानांना श्रध्दांजली वाहण्यासाठी ग्रामस्थांनी शोकसभेचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी पाकिस्तान मुर्दाबादच्या घोषणा देण्यात आल्या. कोल्हेर गावातील मारु ती मंदिरासमोर शोकसभा व सामुदायिक श्रध्दांजली वाहण्यात आली. यावेळी दिंडोरी पंचायत समितीचे उपसभापती उत्तम जाधव , संतोष कोंड, पांडाण्याचे उपसरपंच भाऊसाहेब कड , कोल्हेरचे सरपंच व पोलीस पाटील राजेंद्र गायकवाड , देविदास चौधरी, ज्ञानेश्वर गवळी , संजय चौधरी , दत्तू राऊत , नामदेव गांगोंडे , यादव शार्दूल , रघुनाथ चौधरी ,दिनकर पवार , रमण जोपळे, सुरेश राऊत , विठ्ठल गांगोडे , किसन चौधरी , जयराम गायकवाड, ताराबाई जोपळे , दौलत हाडस , कौतूक चौधरी , नामदेव राऊत , गंगाराम चौधरी , जयसिंग भुसारे , रु खमणी राऊत , कल्पना चौधरी , भारती राऊत , छाया गांगोडे , प्राथमिक शाळेचे विदयार्थी व ज्येष्ठ नागरिक उपस्थित होते .
कोल्हेर येथे शहिदांना श्रद्धांजली
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 18, 2019 12:58 PM