निफाड : राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या पुण्यतिथीनिमित्त निफाड तालुका काँग्रेस कमिटीतर्फे आयोजित कार्यक्रमात आदरांजली वाहण्यात आली.महेश जंगम व निफाड तालुका काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष मधुकर शेलार यांच्या हस्ते राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या प्रतिमेचे पूजन करून पुष्पहार अर्पण करण्यात आला. याप्रसंगी नाशिक जिल्हा काँग्रेस कमिटीचे उपाध्यक्ष विनायक शिंदे, सुनील निकाळे, निफाड तालुका अनुसूचित जाती सेलचे अध्यक्ष राजेश लोखंडे, निफाड तालुका युवक काँग्रेसचे अध्यक्ष सचिन खडताळे, सुहास सुरळीकर, दीपक कुंदे, पुंजाआप्पा तासकर, जाफर पठाण, अंकुश घुमरे, तोसिफ पठाण, समीर शेख, दानिश पठाण, शरीफ शेख, समीर शेख, महेंद्र मोरे, सूरज साळवे आदी उपस्थित होते. सदर कार्यक्रमाचे प्रास्ताविक आणि सूत्रसंचालन निफाड तालुका काँग्रेस कमिटीचे सरचिटणीस सुहास सुरळीकर यांनी केले---------------------------------------------------वैनतेय विद्यालयनिफाड : राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या पुण्यतिथीनिमित्त वैनतेय विद्यालयात आयोजित कार्यक्रमात आदरांजली वाहण्यात आली. याप्रसंगी व्यासपीठावर वैनतेय विद्यालयाचे प्राचार्य डी. बी. वाघ, उपप्राचार्य एस.पी. गोरवे, पर्यवेक्षक बी. आर. सोनवणे, तुकाराम तलवारे, जी.एम. टकले आदी मान्यवर उपस्थित होते. प्राचार्य डी. बी. वाघ यांच्या हस्ते महात्मा गांधी यांच्या प्रतिमेचे पूजन करून पुष्पहार अर्पण करण्यात आला. श्रीमती एस.एस. कापसे यांनी राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या जीवन कार्यावर माहिती सांगितली. याप्रसंगी विद्यालयाचे प्राचार्य डी. बी. वाघ यांचेही भाषण झाले.श्रीमती सी.व्ही. राऊत यांनी महात्मा गांधी यांच्या जीवन कार्यावर आधारित तयार केलेल्या भित्तिपत्रकाचे प्रकाशन प्राचार्य वाघ यांच्या हस्ते करण्यात आले.फोटो - ३० निफाड गांधीवैनतेय विद्यालयात आयोजित कार्यक्रमात राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या प्रतिमेचे पूजन करताना प्राचार्य डी. बी. वाघ सोबत उपप्राचार्य एस.पी. गोरवे, पर्यवेक्षक बी. आर. सोनवणे आदी.
राष्ट्रपित्यास निफाड येथे आदरांजली
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 30, 2021 4:25 PM
निफाड : राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या पुण्यतिथीनिमित्त निफाड तालुका काँग्रेस कमिटीतर्फे आयोजित कार्यक्रमात आदरांजली वाहण्यात आली.
ठळक मुद्देमहात्मा गांधी यांच्या प्रतिमेचे पूजन