नाशिक : विनापरवानगी देशी-विदेशी मद्याची वाहतूक करणाºया कारसह सुमारे पावणेदोन लाख रुपयांचा मद्यसाठा ग्रामीण पोलिसांच्या स्थानिक गुन्हे शाखेने सोमवारी (दि़१९) आंबोली-वेळुंजे परिसरातून जप्त केला़ या प्रकरणी औरंगाबाद येथील दोन संशयितांना ताब्यात घेतले आहे़ग्रामीण पोलीस अधीक्षक संजय दराडे यांनी स्थानिक गुन्हे शाखेस अवैध मद्यनिर्मिती व वाहतूक याबाबत कारवाई करण्याचे आदेश दिले आहेत़ त्यानुसार स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक अशोक करपे यांना जव्हार-त्र्यंबकेश्वररोडने विनापरवाना देशी-विदेशी मद्यांची चोरटी वाहतूक केली जाणार असल्याची माहिती मिळाली होती़ त्यानुसार स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने या परिसरात सापळा रचला होता़ आंबोली-वेळुंजे रस्त्यावर या पथकाने पांढºया रंगाची इंडिका कार (एमएच ०४, ईएस ०१७०) अडवून तिची तपासणी केली असता त्यामध्ये दादरा नगरहवेली येथे निर्मित व केवळ त्याच ठिकाणी विक्रीचा परवाना असलेल्या विदेशी दारूचा साठा आढळून आला़ २३ हजार ४७२ रुपये किमतीच्या या मद्यास महाराष्ट्रात विक्रीसाठी प्रतिबंध आहे़स्थानिक गुन्हे शाखेने इंडिका कारमधील संशयित शेख नफिस शेख इकबाल (रा़टाकळी, जि़औरंगाबाद) व महेश माधव कांबळे (रा़ औरंगाबाद) या दोघांना ताब्यात घेतले असून, त्यांच्याकडील मद्यसाठा व इंडिका कार असा १ लाख ७३ हजार ४७२ रुपयांचा मुद्देमाल जप्त करून या दोघांवर त्र्यंबकेश्वर पोलीस ठाण्यात मुंबई दारूबंदी कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे़ग्रामीण पोलिसांच्या स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक अशोक करपे, पोलीस उपनिरीक्षक मच्ंिछद्र रणमाळे, पोलीस हवालदार राजू दिवटे, पोलीस नाईक जालिंदर खराटे, पोलीस शिपाई लहू भावनाथ, कपालेश्वर ढिकले यांनी ही कारवाई केली़
त्र्यंबकेश्वरला पावणेदोन लाखांचा मद्यसाठा जप्त
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 20, 2018 12:53 AM
नाशिक : विनापरवानगी देशी-विदेशी मद्याची वाहतूक करणाºया कारसह सुमारे पावणेदोन लाख रुपयांचा मद्यसाठा ग्रामीण पोलिसांच्या स्थानिक गुन्हे शाखेने सोमवारी (दि़१९) आंबोली-वेळुंजे परिसरातून जप्त केला़ या प्रकरणी औरंगाबाद येथील दोन संशयितांना ताब्यात घेतले आहे़
ठळक मुद्देअवैध मद्यनिर्मिती व वाहतूक याबाबत कारवाई करण्याचे आदेशदोन संशयितांना ताब्यात घेतले