शहरं
Join us  
Trending Stories
1
चंद्रचूड यांचा लास्ट वर्किंग डे संपला! सर्वांना वाकून नमस्कार करत म्हणाले, दुखावला असाल तर माफ करा...
2
"प्रत्येक गड-किल्ल्यावर मशीद असायला हवी..."; काँग्रेस खासदाराची राज ठाकरेंवर टीका
3
शिवरायांचा भगवा झेंडा दरोडेखोरांच्या हातात शोभून दिसत नाही; उद्धव ठाकरे कडाडले
4
रामटेकच्या गडावरून कडेलोट कुणाचा? चौकसे, किरपान, मुळक यांनी वाढविले टेन्शन!
5
"तुमचा शत्रू जमिनीच्या मार्गाने येतोय"; राज ठाकरेंनी कुणाला दिला इशारा?
6
महायुतीचा मुख्यमंत्री कोण?, अमित शाहांनी दिले संकेत; एका विधानानं चर्चांना उधाण
7
Maharashtra Election 2024: "माफी मागा, अन्यथा...", डी के शिवकुमार यांचा महायुतीच्या नेत्यांना इशारा
8
बहिणीच्या लग्नात अनन्या पांडेने का घातला आईचा २१ वर्ष जुना ड्रेस? समोर आलं कारण
9
पृथ्वी शॉचा 'संघर्ष' कायम! मुंबईनेही दाखवला बाहेरचा रस्ता; ऑस्ट्रेलियन दिग्गजाने पत्राद्वारे दिला धीर
10
'महायुतीचे सरकार बनवायचे, देवेंद्र भाऊंना विजयी करायचे'; अमित शाहांनी पहिलीच सभा गाजवली, विरोधकांवर तोफ डागली
11
नजरेत क्रूरता, आवाजात निष्ठूरता.., 'संगीत मानापमान'मधील उपेंद्र लिमयेचं मोशन पोस्टर रिलीज
12
बाबो! 'पुष्पा २' साठी अल्लू अर्जुनने घेतले ३०० कोटी, रश्मिका अन् फहाद फाजिलला मिळाले फक्त...
13
"जातीजातीत समाज विखुरला जावा; SC, ST, OBC समाज एकजूट राहू नये हा काँग्रेसचा डाव"; मोदींचा हल्लाबोल
14
G-NCAP मध्येही खळबळ उडाली! मारुतीच्या नवी डिझायरला ५ स्टार सेफ्टी रेटिंग; टाटाला मोठा धक्का
15
...तर कोकणातील ३ जिल्हे अख्खा महाराष्ट्र पोसू शकतात; राज ठाकरेंचं कळकळीचं आवाहन
16
UPI पेमेंटसाठी इंटरनेटची गरज भासरणार नाही, 'या' फीचरद्वारे लगेच होणार पेमेंट; काय आहे लिमिट?
17
अब्जाधीश उद्योगपती चिरतरूण राहण्यासाठी करतो दररोज १८ तासांचा उपवास, डाएटमध्ये काय-काय?
18
ओळीने फ्लॉप सिनेमे देणारा अभिनेता आता ४१ व्या वर्षी पुन्हा आजमावणार बॉलिवूडमध्ये नशीब
19
SBI Q2 Results : दुसऱ्या तिमाहीत २८% नं वाढला SBI चा नफा, अपेक्षेपेक्षा अधिक; शेअरची स्थिती काय?

त्र्यंबक नगरपालिका : सुमारे नऊ कोटींचा अर्थसंकल्प

By admin | Published: February 29, 2016 10:21 PM

शिलकी अंदाजपत्रक सादर

त्र्यंबकेश्वर : येथील नगर परिषदेचा ८ कोटी ७० लाख रुपयांचे शिलकी अंदाजपत्रक मुख्याधिकारी निवृत्ती नागरे व प्रमुख लेखापाल धनश्री पैठणकर यांनी रविवारी सभागृहापुढे सादर केला.सभेत अंदाजपत्रकावर चर्चा करण्यात येऊन आवश्यक सूचना करून हा अर्थसंकल्प ९ कोटींपर्यंत नेला. यात काही कर वाढीबाबत सूचना करण्यात आल्या आहेत. प्रत्येक घरामागे स्वच्छता कर रु. १००, तर हॉटेलचालकांना रु. ३००, पालिका गाळ्यांचे दर तीन वर्षांनी रिव्हाईज भाडे वाढ होणार, पोटभाडेकरूंचीही चौकशी होणार, वाहनतळ फी वाढणार, खासगी नळांना मीटर बसणार व त्याप्रमाणे यापुढे पाणीपट्टी आकारणी होणार, बांधकाम परवान्यांची फी वाढणार, विकास शुल्कात वाढ होणार आहे. याशिवाय नगरसेवक धनंजय तुंगार, उपनगराध्यक्ष संतोष कदम, विरोधी गटप्रमुख रवींद्र सोनवणे, योगेश तुंगार, रवींद्र गमे, मुख्याधिकारी निवृत्ती नागरे, अनघा फडके आदिंच्या चर्चेतून काही मार्गदर्शक सूचना करण्यात आल्या. पालिकेपुढे सध्या कचरा डेपोचा महत्त्वाचा विषयी आहे. हा प्रश्न सोडविण्यासाठी सध्या नगरसेवकांनी आपापसातील वाद- मतभेद बाजूला ठेवून सर्वांनी एक होऊन प्रयत्न करणे गरजेचे आहे. अंदाजपत्रकीय सभेत तसे दृश्य पहावयास मिळाले. विरोधी सदस्यांना विश्वासात घेऊन सभा खेळीमेळीच्या वातावरणात पार पडली. प्रमुख लेखापाल यांनी तयार केलेला अर्थसंकल्प सभासदांनी दुरुस्तीसह मंजूर केला. सभेसाठी नगराध्यक्ष विजया लढ्ढा, उपनगराध्यक्ष संतोष कदम, धनंजय तुंगार, योगेश तुंगार, अनघा फडके, रवींद्र सोनवणे, रवींद्र गमे, यशोदा अडसरे, यशवंत भोये, शकुंतला वाटाणे, अंजना कडलग, अलका शिरसाट, सिंधू मधे आदिंसह अभियंता प्रशांत जुन्नरे, दीपक बंगाळ, संजय मिसर, पाणीपुरवठा अभियंता पूर्वा माळी, मधुकर माळी, के.व्ही. ठाकरे, हिरामण ठाकरे आदि उपस्थित होते. (वार्ताहर)