शहरं
Join us  
Trending Stories
1
मतांमधील तफावतीबाबत 'लोकमत'च्या बातमीवर निवडणूक आयोगाचं स्पष्टीकरण, म्हणाले...
2
राज्याचे नवे मुख्यमंत्री कोण? सस्पेन्स अजून कायम; १ किंवा २ डिसेंबरला शपथविधी होणार
3
Today Daily Horoscope: आजचे राशीभविष्य: प्रिय व्यक्तीच्या सहवासात रोमांचित व्हाल!
4
निवडून येतात तेव्हा गपगार, पराभवानंतर EVM ला दाेष; काेर्टाने याचिकाकर्त्यांना फटकारलं
5
कुजबुज! एका छताखाली कोणता झेंडा हाती?; पराभूत उमेदवार आता देवदर्शन करणार
6
प्रत्येक निवडणुकीनंतर EVM विरोधात घोंघावणारे हे वादळ कायमस्वरूपी शमविण्याची गरज
7
...तर महाराष्ट्रात खळबळ उडेल; उद्धव - राज यांनी एकत्र येण्याला आणखी कुठला मुहूर्त हवा?
8
गुजरात ते मुंबई प्रवासात हत्येचा थरार?; तीन वर्षांनी हत्येचा गुन्हा, तपास सुरू
9
...तोपर्यंत कांजूर डम्पिंग बंद करणे अशक्य; मुंबई महापालिका पर्यायी जागेच्या शोधात
10
पश्चिम रेल्वेवर वाढणार एसी लोकलच्या १३ फेऱ्या; वातानुकूलित फेऱ्यांची संख्या ९६ वरून १०९
11
इन्फ्लुएंझामुळे मुंबईकर ‘आजारी’, राज्यात ५७ रुग्णांचा मृत्यू; काय आहेत लक्षणे?
12
झुनझुनवाला यांनी 10 मिनिटांत कमावले ₹105 कोटी; 'या' दोन शेअर्समुळे लागली लॉटरी; पडला पैशांचा पाऊस!
13
विद्यार्थ्यांच्या नोंदणीसाठी शिक्षकांचे 'अपार' कष्ट; २५ टक्के नोंदणी अपूर्ण
14
शेती आणि शेतकरी - यंदाच्या महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीतून दोघेही हद्दपार!
15
‘कॉर्पोरेट’ प्रचार, फतवे अन् व्हायरल इंडिया; निवडणुकीचा प्रचार झालाय हाय-टेक
16
आधारवाडीतील इमारतीच्या पंधराव्या मजल्यावर भीषण आग; अग्निशमन दलाचे वाहन बिघडले
17
Numerology: ‘या’ ६ मूलांक होतील मालामाल, धनलाभाचे योग; नोव्हेंबरची सांगता होईल खास!
18
"हिंदूंच्या हक्कांसंदर्भात बोलणारे निर्लज्ज, ...या सरकारला भारतातील अल्पसंख्यकांची चिंता नाही"; काय म्हणाले ओवेसी?
19
तिसऱ्या महायुद्धात अण्वस्त्रांचा वापर, एक तृतीयांश लोकसंख्या मारली जाणार; सिडनीच्या बिशपची भविष्यवाणी 
20
"हे फक्त शब्द नाहीत, इशारा आहे"; चिमुकलीवरील अत्याचाराच्या घटनेनंतर अमित ठाकरे संतापले

त्र्यंबकची पाणीटंचाई दूर होणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 12, 2019 6:25 PM

त्र्यंबकेश्वर तालुक्यात ग्रामीण पाणीपुरवठा, जि. प. उपविभागामार्फत तथा राष्ट्रीय पेयजल योजनेअंतर्गत सुमारे साडेसहा कोटी रु पयांच्या कामांना शासनाने मंजुरी दिली आहे. या कामांपैकी खैराईपाली मुळवड रायते व अंजनेरीच्या दोन वाड्यांच्या कामांना कार्यादेश प्राप्त झाला आहे.

ठळक मुद्देराष्ट्रीय पेयजल योजनेंतर्गत साडेसहा कोटींच्या कामांना मंजुरी

त्र्यंबकेश्वर : तालुक्यात ग्रामीण पाणीपुरवठा, जि. प. उपविभागामार्फत तथा राष्ट्रीय पेयजल योजनेअंतर्गत सुमारे साडेसहा कोटी रु पयांच्या कामांना शासनाने मंजुरी दिली आहे. या कामांपैकी खैराईपाली मुळवड रायते व अंजनेरीच्या दोन वाड्यांच्या कामांना कार्यादेश प्राप्त झाला आहे.हट्टीपाडा (बेरवळ) शिंदपाडा व मुळेगाव या गावांचे कामांचे प्रस्ताव मंजुरीसाठी शासनास सादर केले आहेत. तसेच प्रशासकीय मान्यतेसाठी मुरंबी व अंबोली असे दोन कामे पाठविण्यात आले आहेत. तर पिंप्री येथील एक काम तांत्रिक मान्यतेसाठी पाठविण्यात आले आहेत.त्र्यंबकेश्वर तालुक्यात पाऊस पडूनही विविध गावे वाड्या-पाडे यांना दरवर्षी पाणीटंचाईला सामोरे जावे लागते. यासाठी दरवर्षी टंचाई नियोजन व टंचाईसाठी होणाऱ्या खर्चासाठी टंचाई आराखडा साधारण आॅक्टोबरमध्ये तयार करून जिल्हाधिकाऱ्यांकडे मंजुरीसाठी पाठविण्यात येतो. जिल्हाधिकारी यांनी मंजुरी दिल्यावरच टंचाईवर खर्च करण्यात येतो. सन २०२०-२१ साठी तयार करण्यात आलेला आराखडा जिल्हाधिकारी,नाशिक यांनी मंजूर करून पाठविला आहे.दरम्यान, त्र्यंबकेश्वर तालुक्याची पावसाची सरासरी २२५० मि.मी. आहे, पण यावर्षी सरासरीच्या चौपट पाऊस पडला. तथापि साठवण क्षमतेअभावी पडलेला पाऊस तालुक्याच्या भौगोलिक परिस्थितीमुळे पाण्याच्या स्वरूपात डोंगर उतारावरून वाहून जाते.तालुक्यात गौतमी गोदावरी प्रकल्पाव्यतिरिक्त एकही मोठा प्रकल्प नाही. गौतमी गोदावरी प्रकल्पाद्वारे नाशिक मनपा व मराठवाड्याला पाणी पुरवितो.सिंचनासाठी फायदाफक्त त्र्यंबकेश्वरला येणाºया यात्रेकरु ंच्या निमित्ताने १० टक्के पाणी मृतसाठ्यातून त्र्यंबक नगर परिषद घेत असते. गौतमी गोदावरी प्रकल्पग्रस्तांनाच थोडाफार लाभ सिंचनासाठी होत असतो. एरवी तालुक्याला या प्रकल्पाचा काहीच फायदा होत नसल्याची भावना शेतकºयांमध्ये निर्माण झाली आहे.

टॅग्स :Nashikनाशिकtrimbakeshwarत्र्यंबकेश्वरwater scarcityपाणी टंचाई