त्र्यंबकेश्वर : तालुक्यात गेल्या दोन दिवसांपासून रिमझिम पाऊस सुरू झाला असून, दमदार नसला तरी सध्या सुरू असलेल्या पावसामुळे पिकांना जीवदान मिळणार असल्याने शेतकरी सुखावले आहेत.भात, नागली या मुख्य पिकांची राहिलेली आवणी सहज करता येऊ शकेल. कारण आवणीसाठी असाच भीज पाऊस हवा असतो. तालुक्यात खरिपाच्या क्षेत्रातील सुमारे ९० टक्के पेरण्या पूर्ण झाल्या आहेत. उर्वरित पेरणी सध्याच्या रिमझिम पावसात आटोपली जाईल. पुढील तीन ते चार दिवसात जोरदार पावसाची गरज आहे. असाच पाऊस पडून ऊन पडल्यास उभ्या पिकांना धोका निर्माण होऊ शकतो. कारण खरीप शेतीला सतत असाही पाऊस बरसत राहिल्यास पीक जास्तच तरारते.दरम्यान तुलनेने मागच्या वर्षापेक्षा यावर्षी कमी पाऊस असला तरी सध्या तरी पिकांसाठी उपयुक्त असल्याची माहिती तालुका कृषी अधिकारी संदीप वळवी यांनी दिली.कृषी विभागाने दिलेल्या पेरणी अहवालानुसार भात सर्वसाधारण क्षेत्र ११,६३४ हेक्टर पैकी ९६५४ हेक्टर पेरणी पूर्ण झाली आहे. नागली ५३९४ हेक्टरपैकी २०६८.३१ हेक्टर क्षेत्रात पेरणी झाली आहे. वरई ३२४१ हेक्टरपैकी ८२५.६ हेक्टर पेरणी झाली आहे, तर तूर, मूग, मसूर, उडीद या कडधान्याचे क्षेत्र कमी असल्याने पेरणी पूर्ण झाली आहे. यावर्षी आतापर्र्यंत त्र्यंबकेश्वर ४७३ मिमी, वेळुंजे ६३४ मिमी व हरसूल ७३४ मिमी पाऊस झाला आहे. मागच्या वर्षी आतापर्यंत १४०० मिमी पाऊस झाला होता.
त्र्यंबकला पावसाने पिकांना जीवदान!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 06, 2020 10:44 PM
त्र्यंबकेश्वर : तालुक्यात गेल्या दोन दिवसांपासून रिमझिम पाऊस सुरू झाला असून, दमदार नसला तरी सध्या सुरू असलेल्या पावसामुळे पिकांना जीवदान मिळणार असल्याने शेतकरी सुखावले आहेत.
ठळक मुद्देतालुक्यात खरिपाच्या क्षेत्रातील सुमारे ९० टक्के पेरण्या पूर्ण झाल्या