त्र्यंबकेश्वर : येथे बारा ज्योतिलर््िंाग गाथा पारायणाचा सोहळा व अखंड हरिनाम द्वादशाह महोत्सव शनिवारपासून (दि.२२) सुरू झाला आहे. हा सोहळा त्र्यंबकेश्वर येथील जव्हार रोडवरील रेणुका हॉल शेजारी आहे. १२ दिवस चालणाऱ्या या सोहळ्याचा समारोप बुधवार, दि. ४ मार्च रोजी होणार आहे. जगद्गुरु तुकोबारायांच्या वेदवाणीचा १२ हजार वाचकांसह जयघोष सुरू झाला आहे.या सोहळ्यात दररोज पहाटे काकड आरती, श्रीविष्णु सहस्त्रनाम व स्तोत्र पठण, मंगलाचरण, गाथा पारायण, कीर्तन, सामाजिक उपक्र म, हरिपाठ, प्रवचन, कीर्तन तर रात्री सांप्रदायिक भजन जागर असे कार्यक्रम होत आहेत.दरम्यान, या गाथा पारायण व हरिनाम द्वादशाह महोत्सवात नामवंत कीर्तनकार व प्रवचनकार हजेरी लवणार आहेत. या हरिनाम द्वादशाह महोत्सवाचा उद्देश समाज प्रबोधन, परिवर्तन व वारकरी सांप्रदाय शुद्धीकरण असा आहे. या सोहळ्याचे उद्घाटन त्र्यंबक बाबा भगत, पंडित महाराज कोल्हे, महंत रघुनाथ महाराज देवबाप्पा, नगराध्यक्ष पुरु षोत्तम लोहगावकर, गणेशनाथ महाराज आदींच्या उपस्थितीत झाले. दीपप्रज्वलन मारु तीबुवा कराडकर मठाचे मठाधिपती जयवंत महाराज कराडकर, महंत सागरानंद सरस्वती, पंढरीनाथ महाराज, प्रसाद महाराज अंमळनेरकर, उमेश महाराज दशरथे यांच्या हस्ते झाले. कार्यक्र माची सांगता प. पू. शांतिगिरी महाराज व प.पू. विठ्ठलस्वामी वडगावकर यांच्या उपस्थितीत होणार आहे. महाप्रसादाने कार्यक्र माची सांगता होईल.ओझरमधून १५ हजार पोळ्यांचे संकलनओझर : त्र्यंबकेश्वर येथे होणाºया गाथा पारायण सोहळ्यासाठी ओझर येथून शनिवारी पंधरा हजार गव्हाच्या पोळ्या पाठविण्यात आल्या. पोळ्यांचे संकलन कासार गल्लीतील विठ्ठल मंदिरात करण्यात आले. यासाठी पुष्पा अक्कर, अंजना कोळपकर, रत्नाबाई अक्कर, सुप्रिया वाघ, रंजना बागुल, वैशाली भालेराव, कासार समाज महिला मंडळ, सुवर्णकार महिला मंडळ, शिंपी समाज महिला मंडळ आदींनी परिश्रम घेतले.
त्र्यंबकला गाथा पारायण सोहळ्यास प्रारंभ
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 22, 2020 11:57 PM
त्र्यंबकेश्वर येथे बारा ज्योतिलर््िंाग गाथा पारायणाचा सोहळा व अखंड हरिनाम द्वादशाह महोत्सव शनिवारपासून (दि.२२) सुरू झाला आहे. हा सोहळा त्र्यंबकेश्वर येथील जव्हार रोडवरील रेणुका हॉल शेजारी आहे. १२ दिवस चालणाऱ्या या सोहळ्याचा समारोप बुधवार, दि. ४ मार्च रोजी होणार आहे. जगद्गुरु तुकोबारायांच्या वेदवाणीचा १२ हजार वाचकांसह जयघोष सुरू झाला आहे.
ठळक मुद्देबारा दिवस कीर्तन, प्रवचनांची मेजवानी । नामवंतांची लागणार हजेरी