त्र्यंबकेश्वर : नियोजनबद्ध प्रचार यंत्रणा आणि कार्यकर्त्यांची मजबुत फळी तसेच अपक्षांमुळे झालेल्या मतविभागणीचा परिणाम यामुळे त्र्यंबकेश्वर नगरपालिकेवर भाजपाने निर्विवाद सत्ता मिळविली. या निवडणुकीत शिवसेना, कॉँग्रेसला मतदारांनी नाकारल्याने सदर पक्षांना आत्मविश्वास नडल्याचे बोलले जात आहे.केंद्र आणि राज्यात सत्तांतर झाल्यानंतर भाजपाकडे इतर पक्षांचे पदाधिकारी आकृष्ठ झाले. याशिवाय भाजपामधील उमेदवारांना पक्षनिधी मिळू शकतो. या काही शक्यता गृहित धरून इतर पक्षातील पदाधिकाºयांनी भाजपात प्रवेश केला आणि विजयी झाले. ज्यांना भाजपाकडून उमेदवारी मिळाली नाही, त्यांनी इतर पक्षात जाणे पसंत केले. काँग्रेस, राष्ट्रवादीने जोमाने प्रचार केला असला तरी शिवसेना, मनसे व अन्य पक्षातील उमेदवारांचा ओघ भाजपाकडे केवळ निवडून येण्यासाठी झाला अन् ते भाजपामध्ये प्रवेश करते झाले आणि पक्षाच्या श्रेष्ठींची मने जिंकण्यासाठी जोमाने प्रचार केला. पालिका निवडणुकीच्या निमित्ताने कार्यकर्त्यांच्या प्रयत्नांमुळे अनेक प्रभागात भाजपाला विजयश्री प्राप्त झाली. प्रभाग एक अ मधील लढत लक्षणीय अशी होती. या लढतीत काँग्रेसचे पांडुरंग कोरडे हे काँग्रेसचे निष्ठावंत पदाधिकारी असुन या प्रभागात त्यांच्या पत्नीला महिला आरक्षणामुळे उमेदवारी दिली. यासाठी आमदार गावित यांनी याच प्रभागात पक्षाचे मेळावे घेतले. मोर्चेबांधणीचे व्यवस्थित नियोजन केले होते. तरीही सौ. कोरडे यांना भारती बदादे यांच्यासारख्या नवख्या उमेदवाराकडून पराभव पत्करावा लागला. तशीच परिस्थिती प्रभाग १ ब मधील झाली आहे. या ठिकाणी काँग्रेसचे कैलास देशमुख तर भाजपकडुन कैलास चोथे यांच्यात होईल असे असे वाटत होते. ही फाईट बिग होणार असे वाटत होते. पण चोथे यांच्या ४५७ या मतांच्या तुलनेत १२७ ही मते म्हणजे काहीच नव्हती. तळपाडे यांना तर अवघी २७ मते पडली. थोडक्यात या दोन्ही उमेदवारांना चोथे यांनी भाजपाच्या माध्यमातून नामोहरण केले. तसे पाहता चोथे हे प्रभाग तीनमधून निवडणूक लढविणार होते. पण या ठिकाणी भाजपाकडुन स्थानिक व विद्यमान नगरसेवक रविंद्र उर्फ बाळासाहेब सोनवणे यांच्या पत्नी त्रिवेणी तुंगार व या उमेदवारी करीत होत्या. बाळा सोनवणे व कैलास चोथे यांचे संबंध नेहमीच सौहार्दाचे असल्याने व बाळा सोनवणे यांच्यापुढे आपला टिकाव लागणार नाही हे ओळखून चोथे यांनी प्रभाग १ ब सारखा सुरक्षित प्रभाग निवडला आणि लिलया विजय मिळवला. प्रभाग तीनमध्ये तर काँग्रेस आणि राष्ट्रवादी या दोन्ही पक्षांनी वेगवेगळे उमेदवार बाळा सोनवणे यांच्या पत्नीच्या विरोधात उभे केले होते. पण ऐन वेळी उमेदवारी अर्ज मागे घेण्याच्या दोन तीन मिनिटे अगोदर अर्ज मागे घेतले.प्रभाग चार ब मधील लढत लक्षणीय होती. लोणारी घराण्याने आयुष्यभर काँग्रेसची सेवा केली. पण काळाची पावले ओळखुन लोणारी घराण्यातील तिसºया पिढीतील दीपक लोणारी यांनी भाजपाकडुन उमेदवारी मागितली आणि त्यांनी शिवसेनेच्या दीपक लोखंडे यांचा पराभव केला. त्यामुळे नगरपालिकेत १४ उमेदवारांचा विजय झाला. शिवसेनेला केवळ दोन तर एका जागेवर अपक्ष विजयीझाला. भाजपाचीच सरशी : गेली ६० वर्षे तेलीगल्लीत शिवसेनेशिवाय दुसरा पक्ष नव्हता. नव्हे बालेकिल्ला होता.पण यावर्षी प्रभाग ५ ब मध्ये भाजपाने शिरकाव करून भाजपा उमेदवार तिरंगी लढतीत यशस्वी ठरला. तोच मुळी तेली गल्लीतीलच रहिवासी स्वप्निल दिलीप शेलार यांच्या रूपाने. स्वत: स्वप्निल शेलार यांचे पिताश्री दिलीप शेलार हे शिवसेनेतर्फे निवडून येऊन नगराध्यक्षदेखील झाले होते. पाच ब मध्ये काँग्रेसचे संतोष नाईकवाडी यांच्या पत्नी माधुरी नाईकवाडी, शिवसेनेचे सचिन वसंतराव कदम या दिग्गज उमेदवार याशिवाय अपक्ष उमेदवार दिलीप मनोहर पवार या उमेदवारांच्या लढतीत अनेक नेत्यांच्या सहकार्याने तेलीगल्लीतील सेनेची व काँग्रेसची मते फोडण्यात यशस्वी ठरून विजय मिळविला. सचिन कदम या तेलीगल्लीतीलच भूमिपुत्राचा १०२ मतांनी पराभव केला. तर पाच अ मध्येही रिपाइं-भाजपा युतीच्या उमेदवार अनिता बागुल यांनी काँग्रसच्या लीला श्यामराव लोंढे व शिवसेनेच्या स्मिता किरण कांबळे या दोघींचाही दारु ण पराभव केला. वास्तविक लोंढे या निवृत्त शिक्षिका तर स्मिता कांबळे यांचे पती किरण कांबळे हे व्यावसायिक वैद्यकीय अधिकारी, तरीही भाजपाच्या अनिता बागुल यांचा दणदणीत विजय झाला. याचे कारण म्हणजे त्यांचे व्यक्तिगत संबंध होय.
त्र्यंबकेश्वर : शिवसेना, कॉँग्रेसला नडला आत्मविश्वास मतविभागणीचा भाजपाला फायदा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 13, 2017 12:00 AM
नियोजनबद्ध प्रचार यंत्रणा आणि कार्यकर्त्यांची मजबुत फळी तसेच अपक्षांमुळे झालेल्या मतविभागणीचा परिणाम यामुळे त्र्यंबकेश्वर नगरपालिकेवर भाजपाने निर्विवाद सत्ता मिळविली.
ठळक मुद्दे भाजपाकडे इतर पक्षांचे पदाधिकारी आकृष्ठ अनेक प्रभागात भाजपाला विजयश्री प्राप्त भाजपा उमेदवार तिरंगी लढतीत यशस्वी