त्र्यंबकेश्वर : त्र्यंबकेश्वर शहराला व नासिकला पाणी पुरवठा करणाºया गंगापुर धरणात पाणी पुरवठा करणाºया गौतमी गोदा प्रकल्पात येथील गोदावरीचे पाणी जाते. गोदावरी व गंगापूर धरणात जाणारा प्लास्टिक व इतर कचरा साफ करण्याची मोहिम हाती घेण्यात आली आहे. अहिल्या धरणापासून ही मोहिम सुरू करण्यात आली. पहिल्याच दिवशी तब्बल एक टँक्टर भरु न प्लास्टिक व इतर कचरा अहिल्या नदीतून काढण्यात आला . सामाजिक कार्यकर्ते उमेश सोनवणे यांच्या संकल्पनेतून ही मोहीम राबविण्यात आली. येथील अहिल्या व गोदावरी नदीत प्लास्टिक व इतर कचरा पडल्याने संपुर्ण पात्र दुषित झाले होते. पुढील महिन्यापासून पावसाला सुरवात होणार आहे. व हा कचरा साफ न केल्यास पावसाळयात हा प्लास्टिकचा कचरा जो शेकडो वर्षे नष्ट होत नाही. तो कचरा थेट गौतमी गोदावरी धरणात (बेझे) येथे जाऊन पाण्यात मिसळतो. या गंभीर बाबींची दखल घेऊनअहिल्या नदीत असणारा कचरा साफ करण्यास पासून सुरवात करण्यात आली. यावेळी पहिल्या दिवशी जवळपास एक टँक्टर इतका कचरा काढण्यात आला. नगरपरिषद कर्मचा-यांनी सदर कचरा भरु न नेला. स्वच्छता मोहिमेमध्ये उमेश सोनवणे, सुभाष सोनकांबळे, दिनेश पाटील , भुषण सोनवणे, सागर पाटील, माणिक मुंदडा आदींनी सहभाग नोंदविला.----------------लहान बालकांनी या स्वच्छता मोहिमेमध्ये सहभाग नोंदविला.सर्व शालेय विद्यार्थांना सुट्या लागल्या आहत्ेत, त्यामुळे सर्व मुले खेळण्यात दंग असतांना अहिल्या नदी स्वच्छता मोहिमेमध्ये हिमांशु सोनवणे, गौरव सोनवणे , करण गांगुर्डे आदींनी उत्सुर्फेतपणे सहभागी होऊन स्वच्छता मोहिम यशस्वी केली. यावेळी नगर परिषद आरोग्य सभापती विष्णु दोबाडे यांनी भेट देऊन या मोहिमेबद्दल आयोजकांचे अभिनंदन केले. नगर परिषदेच्या वतीने ही मोहीम राबविण्यात येईल अशी माहितीही दोबाडे यांनी दिली. गौतमी गोदावरी धरणात जाणार प्लास्टिक कचरा-यांची स्वच्छता केली.
त्र्यंबकेश्वरला गोदावरी नदीतील कचऱ्यासाठी सफाई मोहीम !
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 14, 2018 2:13 PM