त्र्यंबकेश्वर महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी काढलेली फेरी.त्र्यंबकेश्वर : येथील मविप्र समाज संस्थेच्या कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालयात भारत छोडो आंदोलनाच्या अमृतमहोत्सवानिमित्त विद्यार्थी विकास मंडळाने आयोजित केलेल्या कार्यक्रमात स्वातंत्र्यवीरांचे स्मरण करण्यात आले.यावेळी अध्यक्ष म्हणून डॉ. वेदश्री थिगळे उपस्थित होत्या. प्रमुख वक्ते म्हणून इतिहास विभागप्रमुख प्रा. मिलिंद थोरात, संयोजक सुरेश देवरे, प्रा. शरद धट, डॉ. संदीप माळी, प्रा. नीता पुणतांबेकर आदी मान्यवर उपस्थित होते. जले जाव आंदोलनाची माहिती देताना थिगळे यांनी सांगितले की, ८ आॅगस्ट १९४२ ला महात्मा गांधी यांनी इंग्रजांविरु द्ध छोडो भारत अर्थात ‘चले जाव’चा नारा दिला. पुढील काळात या आंदोलनाची धार वाढत जाऊन १५ आॅगस्ट १९४७ ला भारत स्वतंत्र झाला. महाविद्यालयाच्या आवारात सर्व विद्यार्थी व प्राध्यापकांनी शपथ घेतली. नंतर महाविद्यालयाच्या सभागृहात प्रा. मिलिंद थोरात यांनी ‘स्वातंत्र्यलढ्यात क्रांतिकारकांचे योगदान’ या विषयावर पीपीटीद्वारे अभ्यासपूर्ण व्याख्यान दिले.
त्र्यंबकेश्वर महाविद्यालयात स्वातंत्र्यवीरांचे स्मरण!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 03, 2017 12:20 AM