त्र्यंबकेश्वर : शहरात जवळपास १०० वर्षात आतापर्यंत ४१६० मि मी एवढा पाऊस पडला नसेल इतका पाऊस यावर्षी पडला आहे. यापुर्वी आतापर्यंत १८०० ते जेमतेम २००० मि मी पर्यंत पावसाची नोंद झाल्याचे स्मरते.त्र्यंबकेश्वरला पावसाची सरासरी २२५० मि मी इतकी आहे. पुर्वी इंचात पाऊस मोजला जात असे. म्हणजे पावसाची सरासरी ९० इंच पाउस झाला म्हणजे खुपच पडला आहे. असे समजले जात आहे. तर जास्तीत जास्त २५०० मिमि पाउस चार मिहन्यात पडला म्हणजे २५ इंच पडला २५०० मि मी पाऊस बरसणे. अर्थात या पावसाला विक्र मी फार पाऊस पडणे असे म्हटले जात.आतापर्यंत या वर्षी केवळ सव्वा तीन वर्षात मंगळवार (दि.१०) सप्टेंबर पर्यंत ४१६० मि मी पाऊस म्हणजे १६५.६४ इंच पाऊस म्हणजे फारच झाला. दरम्यान अजुनही पावसाचे दिवस आहेत. अजुनही पाऊस थांबण्याचे चिन्ह नाही. अजुनही तो बरसतोच आहे.यंदा पीक परिस्थिती उत्तम आहे. तथापी तालुक्यात अतिवृष्टीने मोठे मोठी रोपे वाहुन गेली. त्यामुळे सर्वच खरीप उत्पन्न कमी होईल असा प्राथमिक अंदाज आहे.गणेशोत्सवात देखील लोक कुठे जाण्यात तयार नाहीत. या वर्षी मात्र तुरळक लोक वगळता बाहेर कुणी गेले नाही. दहीहंडीचा एकच कार्यक्र म झाला. तोही भर पावसात झाल्याने पाहिजे तेवढा उत्साह दिसुन आला नाही. आजही अनेक जाणकार म्हणतात नवरात्रात विजया दशमी ते दिवाळी पर्यंत पाऊस पडेल. असा अंदाज वर्तवतात.आजपर्यंत जर ४१६० मि मी पाऊस बरसला आहे. तर समाप्ती पर्यंत किती होईल ते सांगता येणे अशक्य आहे. यावर्षी बºााच वेळेस १०० च्या वरच पावसाची नोंद करण्यात आली आहे. आज (दि.१०) देखील सकाळपर्यंत १४१ मि मी पाऊस पडला आहे.(फोटो १० त्र्यंबक पाऊस)
त्र्यंबकेश्वरला आतापर्यंत ४१६० मि मी विक्र मी पाऊस !
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 10, 2019 6:53 PM
त्र्यंबकेश्वर : शहरात जवळपास १०० वर्षात आतापर्यंत ४१६० मि मी एवढा पाऊस पडला नसेल इतका पाऊस यावर्षी पडला आहे. यापुर्वी आतापर्यंत १८०० ते जेमतेम २००० मि मी पर्यंत पावसाची नोंद झाल्याचे स्मरते.
ठळक मुद्दे१०० वर्षात एवढा पाऊस पडला नसल्याचे जाणकारांचे मत