नाशिक : त्र्यंबकेश्वर येथील कोलंबिका देवस्थानची दोनशे कोटी रुपये किमतीची शेकडो एकर जमीन विनापरवाना परस्पर विक्री केल्याच्या घोटाळ्याची चौकशी सुरू असतानाच त्र्यंबकेश्वरच्या शंभू पंचायत अटल आखाड्याची ८१ आर जमिनीची परस्पर विक्री करण्यात आल्याची बाब उघडकीस आली आहे. यासंदर्भात आखाड्याने जिल्हाधिकाºयांच्या लोकशाही दिनात तक्रार करून लक्ष वेधले असून, त्याबाबतचे कागदपत्रे मागविण्यात आले आहेत. शंभू पंचायत अटल दशनाम नागा आखाड्याच्या मालकीची त्र्यंबकेश्वर येथे गट नंबर ३५/१/१ मध्ये १७.७ हेक्टर आर जमीन असून, सदर आखाड्याची धर्मादाय संस्थेमार्फत नोंदणीही झालेली आहे. साधारणत: सन २०१६ मध्ये या आखाड्याच्या एकूण जमिनीतील ८१ आर क्षेत्राचा तुकडा पाडून त्यावरील इनाम ही नोंद काढून टाकण्यात आली व काही विश्वस्तांना हाताशीधरून या जमिनीची परस्पर विक्री करण्यात आली. सदर बाब आखाड्याच्या लक्षात येताच त्यांनी यापूर्वी त्र्यंबकेश्वर पोलीस ठाण्यात सर्व कागदपत्रांनिशी तक्रार करण्यात आली असता त्यावर काहीच कार्यवाही झाली नाही. सोमवारी जिल्हाधिकाºयांच्या उपस्थितीत झालेल्या लोकशाही दिनात या संदर्भात आखाड्याच्या प्रमुखांनी तक्रार केली आहे. त्र्यंबकेश्वरचे तत्कालीन तहसीलदार नरेश बहिरम यांच्यासह १४ जणांविरुद्ध तक्रार करण्यात आली आहे. या संदर्भात जिल्हाधिकाºयांना विचारणा केली असता, त्यांनी तक्रारीची दखल घेण्यात आल्याचे तसेच तक्रारदारांकडून आणखी काही पुराव्यांची मागणी केली आहे. सदरची बाब अर्धन्यायिक असल्याने तहसीलदारांच्या आदेशाविरुद्ध अपील करण्याची तरतूद आहे, तशा सूचना आपण संबंधितांना दिल्याचेही जिल्हाधिकाºयांनी सांगितले. जिल्ह्णातील महसूल यंत्रणेकडून जागामालक, बांधकाम व्यावसायिक यांच्याशी संगनमत करून मोठ्या प्रमाणात जमीन घोटाळ्याला अभय दिले जात असल्याचे प्रकार वारंवार घडू लागले असून, त्यातून सर्वच अधिकाºयांकडे संशयाने पाहिले जात आहे.
त्र्यंबकेश्वरला पुन्हा जमीन घोटाळा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 06, 2018 2:00 AM