त्र्यंबकेश्वर : येथील नीलपर्वत परिसरात येत्या २१ फेबु्रवारीला सिद्धपीठ अन्नपूर्णामातेचा प्राणप्रतिष्ठा सोहळा होत असून, यानिमित्त लक्षचंडी महायज्ञाचे आयोजन करण्यात आले आहे. या सोहळ्यास मुख्य अतिथी म्हणून लोकसभा अध्यक्ष सुमित्रा महाजन, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, जिल्ह्याचे पालकमंत्री गिरीश महाजन, राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री एकनाथ शिंदे, जलसंधारण व राज शिष्टाचार मंत्री राम शिंदे आदी उपस्थित राहणार आहेत. सोहळ्यानिमित्त दि. १८ ते २८ फेब्रुवारीपर्यंत लक्षचंडी महायज्ञाचे आयोजन करण्यात आले आहे.प्राणप्रतिष्ठा सोहळ्याचे मुख्य यजमान अॅड. सुनील गुप्ता (इंदूर) तर लक्षचंडी महायज्ञाचे मुख्य यजमान कैलास घुले (त्र्यंबकेश्वर), मूलचंद जैन (मुंबई) आहेत. माँ अन्नपूर्णा प्राणप्रतिष्ठा तथा लक्षचंडी महायज्ञ समितीचे प्रमुख प्रेरणास्त्रोत तथा संस्थापक महामंडलेश्वर स्वामी विश्वेश्वरानंदगिरी, प्रमुख संरक्षक श्रीमहंत गोपालानंद (बापू) जुनागढ यांच्या प्रमुख नेतृत्वाखाली हा महायज्ञ सोहळा होत आहे. दि.१८ ते २८ फेब्रुवारीपर्यंत हा सोहळा सुरू राहणार आहे. या महायज्ञाची तयारी अंतिम टप्प्यात आली असून, शतकुंडी लक्षचंडी यज्ञाचा यज्ञमंडप पूर्णत्वाकडे आहे. मंदिर कलशारोहणासाठी कलशस्तंभ आदी आश्रमात दाखल झालेले आहेत. एकूणच सर्व तयारी अंतिम टप्प्यात जवळपास पूर्णत्वाकडे आहे, अशी माहिती येथील आश्रमाचे व्यवस्था पाहणारे स्वामी दिव्यानंदगिरी यांनी दिली. मध्य प्रदेशमधील ओंकारेश्वरनंतर त्र्यंबकेश्वर येथे तयार झालेले हे मंदिर म्हणजे बांधकाम शैलीचा उत्कृष्ट नमुना आहे. राजस्थानहून मागविलेल्या संगमरवरी पाषाणातून हे मंदिर तयार करण्यात आले आहे. मंदिरात स्थापन करण्यात येणारी अन्नपूर्णामातेची मूर्ती १९३१ किलो वजनाची आहे. ही मूर्ती पंचधातूपासून बनवली आहे. मंदिराच्या भिंतीवर पौराणिक देखावे चितारलेले आहेत.
त्र्यंबकेश्वर : लक्षचंडी महायज्ञाची जय्यत तयारी; विविध मान्यवरांना निमंत्रण अन्नपूर्णामातेची २१ ला प्राणप्रतिष्ठा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 11, 2018 12:01 AM
त्र्यंबकेश्वर : येथील नीलपर्वत परिसरात येत्या २१ फेबु्रवारीला सिद्धपीठ अन्नपूर्णामातेचा प्राणप्रतिष्ठा सोहळा होत असून, यानिमित्त लक्षचंडी महायज्ञाचे आयोजन करण्यात आले आहे.
ठळक मुद्देलक्षचंडी महायज्ञाचे मुख्य यजमानमहायज्ञाची तयारी अंतिम टप्प्यात