शहरं
Join us  
Trending Stories
1
मनोज जरांगेंची मागणी योग्यच, आमचा त्यांना पाठिंबा, पण...; शरद पवारांनी स्पष्ट केली भूमिका
2
"...तर ईश्वर आम्हाला माफ करणार नाही", 'हिट अ‍ॅण्ड रन' घटनेवर उच्च न्यायालय काय म्हणाले?
3
“संभाजीराजेंना ओबीसींचा द्वेष, मतांच्या बेरजेसाठी मनोज जरांगेंना भेटले”; कुणी केली टीका?
4
सरपंच-उपसरपंचांच्या वेतनात वाढ, ग्रामसेवक पदाचं नाव बदललं; मंत्रिमंडळ बैठकीत मोठे निर्णय
5
देशातील रोजगार वाढले, जुलै 2024 मध्ये EPFO मध्ये जोडले गेले 19.94 लाख नवीन सदस्य
6
Rishabh Pant नं शेअर केली बांगलादेशची फिल्ड सेट करण्यामागची Untold Story
7
हरियाणात काय परिस्थिती? ९० जागांपैकी १६-१८ भाजपा जिंकणार? उरलेल्या आप की काँग्रेस...
8
गिरीश महाजनांविरोधात शरद पवारांचा उमेदवार ठरला! जयंत पाटलांकडून शिक्कामोर्तब
9
"आता सर्व काही शुद्ध झाले आहे…", तिरुपती मंदिरातील शुद्धीकरण विधींबाबत पुजाऱ्याचे भाष्य
10
लोकलमध्ये सापडली नोटांनी भरलेली बॅग, रक्कम पाहून पोलीसही अवाक्, तपास सुरू
11
“मिस्टर संभाजी भोसले, ही रयत तुम्हाला राजा मानणार नाही”; लक्ष्मण हाकेंची बोचरी टीका
12
तिरुपती बालाजी मंदिराचे शुद्धीकरण, भगवान व्यंकटेश्वर स्वामींची मागितली माफी
13
Airtel New Recharge Plans: एअरटेलनं लाँच केले ३ नवे प्लॅन्स; रिचार्ज करण्यापूर्वी एकदा पाहाच, काय आहे खास?
14
टीम इंडियानं पाडला बांगलादेशचा बुक्का; मग चव्हाट्यावर आला पाक क्रिकेटमधील 'मॅटर'; जाणून घ्या सविस्तर
15
"त्याला आवर घालायचे काम तुमच्याकडून..."; नितेश राणेंच्या भाषेवरून शरद पवार संतापले, भाजपाला सुनावले
16
युक्रेन युद्धादरम्यान रशियाला मोठा धक्का, चाचणीदरम्यान फुटलं महाक्षेपणास्त्र
17
तिरुपती लाडू वाद: सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल; तपास समिती स्थापन करण्याची मागणी
18
डेटिंग अ‍ॅपवरून ओळख, मुलावर जडलं प्रेम अन् एका फोनमुळे गमावले लाखो रुपये...
19
महिलांसाठी मोठी बातमी: लाडकी बहीण योजनेचा तिसरा हप्ता कधी मिळणार?; नवी माहिती समोर
20
डॉक्टर व्हायचेय, पण बजेट २० लाख आहे, मग या देशात होऊ शकता MBBS

त्र्यंबकेश्वर, पेठला पुन्हा मुसळधार

By admin | Published: August 06, 2016 10:24 PM

वेळुंजेत १५३ मिलिमीटरची विक्रमी नोंद : अनेक ठिकाणी रोपे वाहून गेल्याने शेतकरी हवालदिल

 त्र्यंबकेश्वर : परिसरात शुक्रवारी रात्री अवघ्या १० तासांत १२ किमी अंतरावरील असलेल्या वेळुंजे येथे १५३ मिमी विक्रमी, तर त्र्यंबकला ९४ मिमी पावसाची नोंद झाली. यामुळे हरसूल परिसराचा काही काळ संपर्क तुटून दळणवळण ठप्प झाले.गेल्या आठवडाभरापासून त्र्यंबकेश्वरला पावसाचे सातत्य असून, सलग बरसत आहे. ३० जुलैपासून पाऊस सुरू आहे तो आजपर्यंत सुरूच आहे. त्यामुळे पावसाची सरासरी अव्याहतपणे वाढत आहे. मागील वर्षी चार महिन्याच्या पावसाळ्यात थेट आॅक्टोबरपर्यंत पावसाची नोंद घेतली असता १०७१ मिमी. सरासरी होती. तत्पूर्वी मागील पाच वर्षांची पावसाची आकडेवारी पाहता सन २०११ मध्ये १६५२ मिमी, २०१२-१५२०, २०१३-२१४२, २०१४-१७७४, तर मागील वर्षी अवघा १०७१ मिमी पावसाची सरासरी दिली होती. यावर्षी मात्र जून, जुलै तसेच आॅगस्टच्या पहिल्या आठवड्यापर्यंतच १५०८ मिमी. पाऊस बरसला आहे. एवढा जोरदार पाऊस होऊनही तालुक्यात मात्र ४-५ जनावरे वाहून गेल्याशिवाय कुठले नुकसान झालेले नाही. त्र्यंंबकला तर कधी नव्हे तो २ आॅगस्टला पाऊस पडून सर्व गाव जलमय झाले होते. एवढेच नव्हे तर गोदामाई प्रत्यक्ष दारासमोर तर काहींच्या घरात प्रवेश करून गेली.त्र्यंबकला धार्मिक विधीसाठी येणाऱ्या भाविकांच्या धार्मिक विधीचे पिंडदान दारातूनच करावे लागले. दरम्यान, पावसाचे आगमन जूनमध्ये झाल्यावर बळीराजाने अत्यंत समाधानाने पेरणीची कामे अगदी वेळेवर पूर्ण करून घेतली. सर्वांनी पेरणी करून रोपे येण्याची वाट पाहत असताना वरुणराजा वेळेवर बरसू लागला. आवणीदेखील झाली. काहींची रोपे छोटी होती आणि एकाएकी ३० जुलैपासून जो पाऊस सुरू झाला तो आजपर्यंत सुरूच आहे. अनेकांची रोपे सडली तर काहींची संपूर्ण शेतीच वाहून गेली. परिणामी राजकीय पक्षांनी, शेतकरीवर्ग आदिंनी पंचनामे करून नुकसानभरपाई मिळण्याची मागणी केली आहे. आॅगस्टमध्ये मात्र पावसाचे सातत्य कायम आहे. सिंहस्थाच्या पार्श्वभूमीवर केलेली नवीन कामामधील कासारबारीचा रस्ता खचला असून, सुमारे ७-८ फूट रस्त्यावर खड्डा पडला आहे. गणपतबारी, पहिणे येथे दरडी कोसळल्या होत्या, तर सिंहस्थातील रस्ते खराब झाले आहेत. पावसाची रिपरिप सुरूच आहे. सिन्नरला पावसाची प्रतीक्षाचसिन्नर : तालुक्याच्या पश्चिम पट्ट्यात जोरदार पाऊस पडत असताना पूर्वभागात केवळ रिमझिम पाऊस आहे. विहिरी व बंधाऱ्यांनी तळ गाठला असून, पूर्व भागातील शेतकरी जोरदार पावसाच्या प्रतीक्षेत आहेत.गेल्या आठ दिवसांपासून पश्चिम पट्ट्यात होणाऱ्या पावसामुळे नद्यांना पूर आला आहे. मात्र पूर्व वावी, पांगरी, पाथरे परिसरातील नाले व विहिरी कोरड्या असल्याचे चित्र आहे. या भागात केवळ रिमझिम पाऊस होत असल्याने विहिरींना पाणी उतरले नाही. भोजापूर धरण ओव्हरफ्लो झाल्याने या पूरपाण्याने पूर्व भागातील फुलेनगर (माळवाडी) व दुशिंगपूर येथील बंधारे भरून देण्याची मागणी करण्यात येत आहे. (वार्ताहर)