त्र्यंबकेश्वर : केंद्र शासनाच्या राष्ट्रीय रुरबन (रूर म्हणजे रुरल - ग्रामीण व बन म्हणजे अर्बन - नागरी) मिशन या महत्त्वाकांक्षी योजनेत त्र्यंबकेश्वर तालुक्याचा समावेश करण्यात आला आहे. देशातील ३०० तालुक्यांपैकी महाराष्ट्रातील त्र्यंबक तालुक्याचा समावेश या योजनेत झाला आहे. त्यामुळे तालुक्यातील आदिवासी क्षेत्रातील विकासापासून वंचित २० ते ३० गावांचा समूह तयार करून त्या परिसराचा सर्वांगीण विकास करण्यासाठी केंद्र व राज्य सरकार मिळून सुमारे १०० कोटींचा निधी प्राप्त होणार आहे. यात ३० टक्के निधी केंद्र शासन व ७० टक्के निधी राज्य शासनाचा असेल.रूरबन योजनेची अंतिम मान्यता व निधी मिळविण्यासाठी सविस्तर प्रस्ताव एका महिन्याच्या आत केंद्र शासनास सादर करणार असून, तालुक्यातील आदिवासी भागाचा सर्वंकष विकास साधण्यासाठी व शहरी भागात असणाºया सर्व पायाभूत सुविधा देण्यासह गाव समूहाचा आर्थिक, सामाजिक स्तर उंचावण्यासाठी ही योजना सुरू केली आहे. या योजनेत तालुक्यातील २० ते ३० गावांची निवड करून त्यांचा विकासाच्या दृष्टीने गाव समूह तयार करत त्यासाठी केंद्र व राज्य शासन निधी उपलब्ध करून देणार असल्याची माहिती खासदार हेमंत गोडसे यांनी दिली. तसेच शासनाच्या विविध योजनांचे एक केंद्राभिमुख केले जाणार आहे. त्यासाठी एकात्मिक गावसमूह कृती आराखडा तयार केला जाणार आहे. त्यास समाविष्ट केलेल्या प्रत्येक गावाच्या ग्रामसभेत आराखड्यास मंजूर घेत पायाभूत सुविधांचा विकास केला जाणार आहे, अशी माहिती खासदार हेमंत गोडसे यांनी दिली.
केंद्राच्या योजनेत त्र्यंबकेश्वर१०० कोटींचा निधी मंजूर : शहर विकासालाही चालना; महिनाभरात करणार अहवाल सादर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 11, 2017 12:43 AM
केंद्र शासनाच्या राष्ट्रीय रुरबन (रूर म्हणजे रुरल - ग्रामीण व बन म्हणजे अर्बन - नागरी) मिशन या महत्त्वाकांक्षी योजनेत त्र्यंबकेश्वर तालुक्याचा समावेश करण्यात आला आहे.
ठळक मुद्दे३०० तालुक्यांपैकी त्र्यंबकचा समावेशप्रस्ताव महिन्याच्या आत केंद्र शासनास सादर शासन निधी उपलब्ध करून देणार