वेळुंजे(त्र्यं) : हरसूल ता. त्र्यंबकेश्वर येथे मुख्य रस्त्यावर विविध मागण्यांसाठी त्र्यंबकेश्वर तालुका किसान सभेच्यावतीने ठिय्या आंदोलन करण्यात आले. सकाळी ११ वा. सुरू असलेले आंदोलन सायंकाळी ६ वा.मागे घेण्यात आले.आपल्या विविध मागण्यांसाठी माकपच्यावतीने आंदोलन करण्यात आले. हरसूल येथील मुख्य रस्त्यावर सकाळी अकरा वाजेच्या दरम्यान सुरू असलेले आंदोलन सायंकाळी सहा वाजता मागे घेण्यात आला.त्र्यंबकेश्वर तालुका दुष्काळी जाहीर करून नुकसान भरपाई द्या. वनाधिकाऱ्यांच्या अंमलबजावणीतील सावळागोंधळ बंद करून ताब्यातील कसत असलेली जमीन वनजमीन नावावर करा, तालुक्यातील सार्वजनिक बांधकाम खाते,जिल्हा परिषद, मुख्यमंत्री ग्रामसडक योजना या खात्यातील खराब व अपूर्ण रस्ते कामांची चौकशी करून संबंधितांवर कायदेशीर कारवाई करून रस्ते सुधारणा करा, तालुक्यातील रस्ते खड्डे मुक्त करा, भरमसाठ वीजबिले वसूल करून गरिबांची होणारी लूट त्वरित थांबवा, वृद्धपकाळ पेन्शन योजनेचा लाभ प्रत्येक वयस्कर, म्हातारे यांना द्या, जुने खराब झालेल्या व नवीन अर्जदारांना त्वरित रेशनकार्ड द्या, घरकुलाचे हप्ते लाभार्थ्यांना त्वरित द्या या विविध मागण्यांसाठी त्र्यंबकेश्वर तालुका किसान सभेच्यावतीने आंदोलन करण्यात आले. यावेळी प्रांताधिकारी राहुल पाटील, तहसीलदार महेंद्र पवार, गटविकास अधिकारी मधुकर मुरकुटे, तालुका कृषी अधिकारी अजय सूर्यवंशी, सार्वजनिक बांधकाम खाते, लघु पाटबंधारे, वन विभाग, महामंडळचे अधिकारी उपस्थित होते.या मोर्च्यात जिल्हा परिषद सदस्य रमेश बरफ, पंचायत समिती सभापती ज्योती राऊत, प. स. सदस्य देवराम मौळे, लक्ष्मण कनोजे, पांडू दुमाडे, शिवराम गावित, भाऊराज राथड, अर्जुन कनोजे आदींसह हजारो आंदोलक उपस्थित होते. यावेळी हरसूल पोलिसांनी चोख बंदोबस्त ठेवला होता.
त्र्यंबकेश्वर तालुका दुष्काळ जाहीर करा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 21, 2018 4:31 PM
वेळुंजे(त्र्यं) : हरसूल ता. त्र्यंबकेश्वर येथे मुख्य रस्त्यावर विविध मागण्यांसाठी त्र्यंबकेश्वर तालुका किसान सभेच्यावतीने ठिय्या आंदोलन करण्यात आले. सकाळी ११ वा. सुरू असलेले आंदोलन सायंकाळी ६ वा.मागे घेण्यात आले.
ठळक मुद्देहरसुल : माकपाचे ठिय्या आंदोलन सायंकाळी सहानंतर मागे