त्र्यंबकेश्वर : तालुक्यातील अनेक गावांमध्ये भीषण पाणी टंचाई सुरु आहे. ग्रामस्थांचे पाण्यासाठी हाल होत आहेत. वारंवार मागणी करु नही तसेच जिल्हाधिकारी कार्यालयात प्रस्ताव सादर करूनही अद्याप टँकरने पाणी मिळत नाही. त्यामुळे तहानलेल्या सोमनाथनगर, होलदार नगर, शिवाजीनगर, मूलवड, मुरंबी, विनायकनगर, देवळा, मेटघर किल्ला व सहा पाडे आदींसह या गावांना प्राधान्याने पिण्याच्या पाण्याचे टँकर किंवा अन्य उपाययोजना उपलब्ध करण्यासाठी जिल्हा परिषद सदस्य रु पांजली माळेकर यांनी जिल्हाधिकाºयांना दिलेल्या पत्रात कळविले आहे. दोन महिन्यांपुर्वीच सोमनाथनगर येथील ग्रामसेवकांनी पाणी टंचाईचा प्रस्ताव सादर केला असतांना तो लालफितीत अडकल्याने गावकºयांना पिण्याच्या पाण्यापासून वंचित राहावे लागले आहे. वेळोवेळी पाठपुरावा करु नही जिल्हाधिकारी कार्यालयाच्या टंचाई शाखेत त्र्यंबकेश्वर तालुक्यातील गावांचे पाणी टंचाई प्रस्ताव दाखल झालेले आहेत. मात्र अद्याप पाणी टंचाई टँकर सुरु न झाल्याने जनता मेटाकुटीला आली आहे. माळेकर यांनी हरसूल गटात पिण्याच्या पाण्यासाठी जिल्हाधिकाºयांना दिलेल्या पत्राचा त्र्यंबकेश्वर तालुक्यातील पाणीटंचाईचा उल्लेख केला आहे. दिवसागणिक परिस्थिती भीषण होत आहे. या ठिकाणी सर्वाधिक पाऊस पडून ही मार्चनंतर पाणी टंचाईस तोंड द्यावे लागते. त्यामुळे विविध गावांतुन टँकरची मागणी आल्यानंतर तातडीने टँकरला मंजूरी देण्याची आवश्यकता असते. मात्र,तालुका प्रशासनाकडून पाणी टंचाई प्रस्ताव छोट्या छोट्या कारणांनी फेटाळण्याचे प्रमाण अधिक आहे. त्यामुळे अनेक दिवस हे प्रस्ताव प्रलंबित राहतात. नागरिकांना वणवण भटकण्याची वेळ आली आहे.----------------जलयुक्त शिवार योजनेबाबत विचारणागावांचा टंचाई कृती आराखड्यात समावेश आहे. जलयुक्त शिवार योजनेत समावेश आहे का ? अशी विचारणा करून प्रस्ताव प्रलंबित ठेवले जात आहेत. कालापव्यय केला जात आहे, यात ग्रामसेवक शासनाचा प्रतिनिधी असल्याने त्यांनी दिलेला पाणी टंचाई प्रस्ताव ग्राह्य धरला जावा जेणे करु न गाव पातळीवरु न जिल्हाधिकारी कार्यालयात प्रस्ताव येण्यास विलंब होणार नाही. मात्र आलेल्या प्रस्तावाची खातरजमा करण्यासाठी तहसिलदार गटविकास अधिकारी व जिल्हा परिषद लघु पाटबंधारे विभागाचे अभियंता आदींची समिती प्रस्ताव खरा की खोटा याची खातरजमा करण्यासाठी व्हेरीफिकेशन नाट्य घालुन नाहक कालापव्यय केला जातो. यास्तव गावकºयांना लवकर पाणी मिळावे व टँकर लवकरात लवकर सुुरु करावेत अशी मागणी केली आहे.
टॅँकरचा प्रस्ताव देऊनही त्र्यंबकेश्वर तालुका अद्याप तहानलेलाच !
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 14, 2018 2:36 PM