त्र्यंबकेश्वर : येथील डॉ.आंबेडकर चौकात शुक्र वारी (दि.८) गटारात हॉटेलचालकांकडून शिळे अन्न टाकण्यात आल्याने प्रचंड दुर्गंधी पसरली होती. त्यामुळे त्र्यंबकेश्वरी आलेल्या भाविकांना त्याचा त्रास सहन करावा लागल्याने त्यांनी नाराजी व्यक्त केली.नगरपालिकेच्या आरोग्य विभागाने हॉटेलसमोरील व बाजुच्या गटारी भरल्याने त्या साफ करण्यासाठी कर्मचारी पाठविले असता यावेळी गटारीवरचे ढापे काढल्यानंतर संपुर्ण आंबेडकर चौकात भयंकर दुर्गंधी सुटली. या दुर्गंधीमुळे परिसरातून येणाऱ्या-जाणाऱ्या भाविकांसह नागरिकांना नाकाला रुमाल लावूनच मार्गक्रमण करावे लागले. चौकशीअंती, सदर गटारींमध्ये आसपासच्या हॉटेल चालकांकडून शिळे अन्न पदार्थ टाकले जात असल्याचे उघडकीस आले आहे. त्यामुळे संबंधित हॉटेल चालकांवर कठोर कारवाईची मागणी होत आहे. बाजुलाच त्र्यंबक नगरपालिका कार्यालय आहे. यावेळी पालिकेचे स्वच्छता निरीक्षक एच. आर. ठाकरे यांनी भेट देऊन पाहणी केली आणि एका हॉटेल चालकाला कार्यालयात पाचारण करून समज दिली तर इतर हॉटेल चालकांवर कारवाईची तयारी सुरू केली आहे.दरम्यान हॉटेल मालकांनी अन्नपदार्थ गटारात टाकण्याऐवजी पालिकेच्या बायोगॅस प्रकल्पाच्या गाडीत टाकावेत, असे आवाहन पालिकेच्यावतीने करण्यात आले आहे.
त्र्यंबकेश्वरी हॉटेलचे शिळे अन्न गटारात
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 09, 2019 5:26 PM
चालकांचा प्रताप : दुर्गंधीमुळे भाविकांमध्ये प्रचंड नाराजी
ठळक मुद्देदरम्यान हॉटेल मालकांनी अन्नपदार्थ गटारात टाकण्याऐवजी पालिकेच्या बायोगॅस प्रकल्पाच्या गाडीत टाकावेत, असे आवाहन पालिकेच्यावतीने करण्यात आले आहे