त्र्यंबकेश्वर : येथील नगर परिषदेच्या विषय समित्यांची निवड तहसीलदार महेंद्र पवार यांनी घोषित केली. आरोग्य सभापती माधवी माधवराव भुजंग, बांधकाम सभापती सायली हर्षल शिखरे, पाणीपुरवठा व जलनिस्सारण समिती सभापती - शिल्पा नितीन रामायणे, महिला व बालकल्याण समिती सभापती भारती संपतराव बदादे, शिक्षण, क्र ीडा व सांस्कृतिक कार्य समिती सभापती- कैलास कोंडाजी चोथे यांची निवड करण्यात आली. स्थायी समितीचे सभापती तथा अध्यक्ष पुरु षोत्तम लोहगावकर तर शिक्षण, क्र ीडा व सांस्कृतिक कार्य समितीचे पदसिद्ध सभापती उपनगराध्यक्ष कैलास चोथे आहेत. तहसीलदार तथा प्राधिकृत अधिकारी महेंद्र पवार यांच्या अध्यक्षतेखाली बैठक घेण्यात आली. यावेळी विषय समित्या किती असाव्यात, विषय समितीमध्ये किती सदस्य असावेत व प्रत्येक विषय समितीमध्ये इच्छुक सदस्यांचे नामनिर्देशन पत्र स्वीकारण्यात आले. दुपारी प्रत्येक विषय समिती व प्रत्येक विषय समितीच्या नावाची सभापती म्हणून बिनविरोध निवड पवार यांनी घोषित केली. यावरून सध्या त्र्यंबक नगरपरिषदेमध्ये महिलाराज सुरू झाले आहे. अध्यक्ष व उपाध्यक्ष वगळले तर मुख्याधिकारी व सर्व सभापती पाहता महिलाराजच आहे. स्थायी समिती ही नगर परिषदेत महत्त्वाची समिती असते. वार्षिक अंदाजपत्रकदेखील सर्वप्रथम स्थायी समितीवरच अगोदर मंजूर करण्यात येते. या स्थायी समितीचे सभापती तथा नगराध्यक्ष पुरु षोत्तम लोहगावकर, सदस्य कैलास चोथे, माधवी भुजंग, शिल्पा रामायणे, सायली शिखरे, भारती बदादे याप्रमाणे स्थायी समितीत सदस्यांचा समावेश आहे. यावेळी व्यासपीठावर मुख्याधिकारी डॉ. चेतना मानुरे-केरु रे तसेच सहायक कार्यालय अधीक्षक संजय मिसर यांनी निवडणुकीचे कामकाज पाहिले. (फोटो नावानिशी)
त्र्यंबकेश्वरला विषय समित्यांची निवड बिनविरोध
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 24, 2019 6:25 PM