त्र्यंबकला बैठक : शासनाविरूद्ध पुकारणार एल्गार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 3, 2018 05:47 PM2018-10-03T17:47:13+5:302018-10-03T17:47:59+5:30
त्र्यंबकेश्वर : महाराष्ट्राच्या हितासाठी, जनतेच्या हक्कांसाठी व बळीराजाच्या कष्टाला सन्मान मिळवून देण्यासह सर्वसामान्यांसह राज्यापुढील समस्यांना वाचा फोडण्यासाठी काँग्रेसने जनसंघर्ष यात्रेद्वारे आक्र मक भूमिका घेतली आहे.
त्र्यंबकेश्वर : महाराष्ट्राच्या हितासाठी, जनतेच्या हक्कांसाठी व बळीराजाच्या कष्टाला सन्मान मिळवून देण्यासह सर्वसामान्यांसह राज्यापुढील समस्यांना वाचा फोडण्यासाठी काँग्रेसने जनसंघर्ष यात्रेद्वारे आक्र मक भूमिका घेतली आहे. तसेच शेतकरी आत्महत्या, कर्जमाफी योजना आण िशेतकऱ्यांच्या विविध समस्या आदी प्रश्न जनसंघर्ष यात्रेत घेणार आहेत. या यात्रेचे आयोजन नाशिक जिल्ह्यात करण्यात आले असल्याची माहिती आमदार निर्मला गावित यांनी दिली आहे. जनसंघर्ष यात्रेत महाराष्ट्राचे प्रभारी मिल्लकार्जुन खर्गे, प्रदेशाध्यक्ष खा. अशोकराव चव्हाण, विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे-पाटील, माजी मुख्यमंत्री आ.पृथ्वीराज चव्हाण तसेच जि.प.चे माजी उपाध्यक्ष तथा तालुकाध्यक्ष संपतराव सकाळे आदी नेते मार्गदर्शन करणार आहेत. या यात्रेत इगतपुरी तालुक्यातील जनतेने मोठ्या संख्येने उपस्थित रहावे, असे अवाहन आमदार निर्मला गावित यांच्यासह जिल्ह्यातील काँग्रेस नेते, पदाधिकारी उपस्थित राहणार आहेत. तरी या सभेस मोठ्या संख्येने नागरिकांनी उपस्थित रहावे, असे आवाहन काँगे्रसचे तालुकाध्यक्ष कचरू पा. डुकरे, पांडुरंग शिंदे, सोमनाथ जोशी, साहेबराव धोंगडे, विलास मालुंजकर, विजय खातळे, सचिन मते आदींनी केले आहे.