या संदर्भात पालिकेच्या पाणीपुरवठा विभागाशी संपर्क साधला असता माहिती घेतो व पाणी सोडावयास सांगतो असे सांगण्यात आले, तर ज्याच्याकडे पाणी सोडण्याचे काम आहे, त्या कर्मचाऱ्यानेदेखील पिंपळद शिवारात पाइपलाइन फुटली आहे. ती आज दुरुस्त करतो व उद्यापासून नियमित पाणी येईल, असे सांगण्यात आले. गेल्या चार-पाच दिवसांपासून पाइपलाइन फुटल्याने लाखो लिटर पाणी वाया गेले. मात्र नगरपालिका कर्मचारी निष्काळजीपणे वागत असल्याचे प्रत्यंतर येत आहे.
चार-पाच दिवसांपासून त्र्यंबकला कमी दाबाने पाणी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 04, 2020 4:37 AM