पेठ : शहरानजीकच्या हट्टीपाड्याजवळ नव्यानेच बनविलेल्या गुजरात राष्ट्रीय महामार्गावर मोठमोठे खड्डे पडल्याने शनिवारी ( दि.२१) रोजी सकाळी ट्रक, ट्रेलर व पिकअप अशा तीन वाहनांच्या अपघातात वाहनांचे प्रचंड नुकसान झाले असून खड्डेमय रस्त्यामुळे अपघातांचे प्रमाण वाढले आहे. नाशिककडून गुजरातकडे जाणारी पिकअप एमएच-१७-बीवाय-२४४१ क्रमांकाच्या पिकअप गाडीस पाठीमागून येणारी मालट्रक क्रमांक केए-०१-एजे-९८५८ याने खड्डा चुकविण्याच्या नादात धडक दिल्याने रासायनिक पिंपे भरलेली पिकअप रस्त्यावरच पलटी झाली. मात्र धडक देणारा ट्रक घेऊन ट्रक चालकाने पलायन केले. मात्र त्याही अवस्थेत पिकअप चालकाने दुसऱ्या वाहनाने ट्रकला अडवून वाहन पेठ पोलीस ठाण्यात आणले. पिकअप रस्त्यावरच पलटी झालेला असतांना थोड्या वेळातच गुजरातकडून येणाऱ्या दुसरा तिरुपती रोड लाइन्सचा ट्रक क्रमांक एमएच १३- सीयू-८१८४ हा वेगात असल्याने अपघातग्रस्त पिकअपला धडकून पलटी झाला. रस्त्याच्या दुरवस्थेमुळे तीनही वाहनांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले. सुदैवाने प्राणहानी टळली असली तरीही अल्प कालावधीत रस्ते उखडून जाऊन खड्डे पडत असल्याने रस्त्यांच्या दर्जाबाबत प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे .
----------------
रस्ता दुरुस्त न केल्यास आंदोलन
हट्टीपाडा गावाजवळ राष्ट्रीय महामार्गावर पडलेले खड्डे प्रवाशांसह परिसरातील नागरिकांना जीवघेणे ठरत असून अनेक वेळा पाठपुरावा करूनही याकडे संबंधित प्रशासन दुर्लक्ष करत असल्याने शिवसेनेच्या वतीने आंदोलन छेडण्याचा इशारा तालुकाप्रमुख भास्कर गावित, मनोज घोंगे, मोहन कामडी आदींनी दिला आहे.
-------------
हट्टीपाडा ता. पेठ गावाजवळ अपघातग्रस्त झालेली वाहने. (२१ पेठ ॲक्सिडेंट)
210821\21nsk_17_21082021_13.jpg
२१ पेठ ॲक्सीडेंट