घोटी : मुंबई - आग्रा महामार्गावर मुंढेगावजवळ मंगळवारी (दि. ५) सकाळी तिहेरी अपघात झाला. या अपघातात चारजण गंभीर जखमी झाले असून, त्यांना उपचारार्थ नाशिक येथे हलविण्यात आले आहे. अपघातानंतर ट्रकने अचानक पेट घेतल्याने महामार्गावरील वाहतूक काही काळ ठप्प झाली होती. घोटी पोलिसांनी वेळीच हस्तक्षेप करत वाहतूक सुरुळीत केली. याबाबत घोटी पोलिसांनी अपघाताचा गुन्हा दाखल केला आहे.मुंबई महामार्गावर मुंढेगाव शिवारात नाशिककडे जाणाऱ्या प्रवासी वाहनाला ट्रकने (क्र. एमएच ०४ एचवाय ७४७४) धडक दिली. त्यानंतर मागून येणाºया ट्रकने अपघातग्रस्त वाहनाला धडक दिली. यामुळे या ट्रकने अचानक पेट घेतला. या अपघातानानंतर एक वाहन फरार झाले आहे. या वाहनाचा पोलीस शोध घेत आहेत. अपघातात प्रवासी वाहनातील पांडुरंग गंगाराम चिते (३५), रामदास गंगाराम चिते (४०), लीलाबाई रामदास चिते (३०, रा. हरसूल, ता. देवळा) व कार्तिक राजाराम आंबेकर (१५) रा. मुकणे असे चौघे जखमी झाले. त्यांना नरेंद्रनाथ संस्थानाच्या रुग्णवाहिकेतून तात्काळ नाशिक येथे उपचारार्थ हलविण्यात आले.अपघाताची माहिती समजताच घोटी पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक पंकज भालेराव यांच्यासह हवालदार सुहास गोसावी आदींनी घटनास्थळी धाव घेत वाहतूक एका बाजूने वळविली व टोल प्लाझा व इगतपुरी नगरपालिकेच्या अग्निशमन बंबाच्या साहाय्याने ट्रकची आग विझविण्यात आली. त्यानंतर तासाभराने पुन्हा वाहतूक पूर्ववत करण्यात आली.
मुंढेगावजवळ तिहेरी अपघात
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 06, 2018 1:08 AM
घोटी : मुंबई - आग्रा महामार्गावर मुंढेगावजवळ मंगळवारी (दि. ५) सकाळी तिहेरी अपघात झाला. या अपघातात चारजण गंभीर जखमी झाले असून, त्यांना उपचारार्थ नाशिक येथे हलविण्यात आले आहे. अपघातानंतर ट्रकने अचानक पेट घेतल्याने महामार्गावरील वाहतूक काही काळ ठप्प झाली होती. घोटी पोलिसांनी वेळीच हस्तक्षेप करत वाहतूक सुरुळीत केली. याबाबत घोटी पोलिसांनी अपघाताचा गुन्हा दाखल केला आहे.
ठळक मुद्देचौघे जखमी : ट्रकने घेतला पेट; वाहतूक ठप्प