नाशिक : कोरोनाच्या वाढत्या प्रकोपात सर्वाधिक महत्त्वाच्या बाबींमध्ये मास्क, सुरक्षित अंतर आणि हातांची स्वच्छता यांचा प्रामुख्याने समावेश आहे. त्यातही मास्क हा ट्रीपल लेअरचा असणे नागरिकांना अधिक सुरक्षित करते.
प्रत्येक नागरिकाने आरोग्यदायी जीवनशैलीचा स्वीकार करणे काळाची गरज झाली आहे. सध्याच्या परिस्थितीत प्रत्येकाला जर सुरक्षित राहायचे असेल तर त्या व्यक्तीने थंड पदार्थांपासून स्वत:ला कटाक्षाने दूर ठेवणे आवश्यक आहे. मुळात घराबाहेरचे खाद्यपदार्थ पूर्णपणे वर्ज्य करावेत. तसेच घराबाहेर पडणाऱ्या प्रत्येक व्यक्तीने सकाळ आणि संध्याकाळ असे दोनवेळा तर घरीच असणाऱ्या व्यक्तींनी दिवसातून किमान एकदा तरी वाफ घ्यावी. तसेच बाहेरून घरी आल्यानंतर प्रत्येक नागरिकाने त्यांचे कपडे स्वत:च गरम पाण्यात भिजवावेत. अत्यंत आवश्यकता असेल तेव्हाच घराबाहेर पडण्याबाबत स्वत: नागरिकांनीच ठाम राहायला हवे. तसेच घरी अत्यंत सकस आणि संतुलित आहाराचा समावेश असावा. त्यात पुरेशा प्रमाणात प्रथिनांचा समावेश असणे आवश्यक आहे. तसेच दररोज किमान सात तासाची झोप घेणेदेखील अत्यावश्यक आहे. सकाळी आणि रात्री दररोज कोमट मिठाच्या पाण्याने गुळण्या करणे आवश्यक आहे. पाण्याने नागरिकांनी अधिकाधिक प्रमाणात दक्षता बाळगतानाच या साध्यासोप्या उपायांचा अवलंब केल्यास त्यांचा निश्चितपणे फायदा होऊ शकतोे. तसेच प्रत्येक नागरिकाने लसीकरणाचे दोन डोस निर्धारित कालावधीत पूर्ण करून घेतल्यास ते कोरोनापासून स्वत:चा बचाव करू शकतात.
डॉ. अनंत पवार. जिल्हा कोरोना नोडल अधिकारी
फोटो
२६ डॉ. पवार