त्र्यंबकेश्वर : दीपावलीनंतर येत्या २९ नोव्हेंबरला त्रिपुरारी पौर्णिमा आहे. रथोत्सवाची सुरुवात २८ नोव्हेंबर वैकुंठ चतुर्दशीपासूनच होत असते. कार्तिक शुद्ध पौर्णिमेस देव दिवाळी म्हणून त्र्यंबकेश्वरचे भूषण असलेला रथोत्सव वैकुंठ चतुर्थीपासूनच सुरू होतो. कोरोना कोविडच्या पार्श्वभूमीवर दिवाळी पाडव्याच्या (बली प्रतिपदा) मंदिर उघडण्यात आले. या पार्श्वभूमीवर शहराचे भूषण असलेला रथोत्सव परंपरेप्रमाणे यंदाही मोठ्या धुमधडाक्यात साजरा होत आहे. श्री. त्र्यंबकेश्वर देवस्थानच्या नियमाप्रमाणे मंदिरावर विद्युती करण करण्यात येणार आहे. १०० फूट लांबीच्या विद्युत माळा तयार करण्यात येणार आहे. त्र्यंबक राजाच्या रथाची रंगरंगोटी विजय दाभाडे करीत आहेत. सध्या काम प्रगतीवर असून, रथ निघण्यापूर्वी दोन दिवस अगोदर रथाच्या रंगरंगोटीचे काम पूर्ण होण्याची शक्यता आहे. रथोत्सव पेशवे कालीन परंपरे प्रमाणे साजरा केला जाईल. नेहमीप्रमाणे त्रिपूर वाती मंदिर प्रांगणातच जाळल्या जातील. मंदिराची आकर्षक विद्युत रोषणाई सुशोभीकरण डोळ्यांचे पारणे फेडणारी आहे. तसेच मंदिरावरील विद्युत रोषणाई पाहण्यासाठी फिजिकल अंतर ठेवूनच पाहता येईल. सुवासिनींना त्रिपूर वातीही जाळता येतील. आता मुख्य मंदिर उघडण्यात आले आहे. त्रिपुरारी पौर्णिमेस दुपारी ११ ते १२ यादरम्यान ग्रामदेवता महादेवीला गाडाभर अन्नाचा नैवेद्य रेड्याच्या गाडीत पोहोचविला जातो. मंदिर उघडल्याने आता शहराचे अर्थचक्र हळुहळु पूर्वपदावर येईल.
परंपरेप्रमाणे होणार त्रिपुरारीला रथोत्सव !
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 20, 2020 9:19 PM