शहरं
Join us  
Trending Stories
1
अबब... काय तो स्टॅमिना! धड झोप नाही, खाण्याची वेळ नाही, प्रचारादरम्यान, नेतेमंडळी कोणती काळजी घेतात?
2
थंडीविना केवळ १९ टक्के क्षेत्रावरच रब्बीच्या पेरण्या, ज्वारी ३४ टक्के, हरभरा १७, गव्हाचा केवळ ४ टक्के पेरा पूर्ण
3
संजूचं शतक; आफ्रिकेत फिरकीची 'करामत' अन् सूर्याच्या कॅप्टन्सीत टीम इंडियाचा विजयी धडाका कायम!
4
ठाण्यात बिल न देता हॉटेलात जायची सवय तेच दावोसमध्ये केले; जयंत पाटलांचा शिंदेंना जोरदार टोला 
5
कॅप्टन सूर्याकडून तो खास मेसेज मिळाला अन् संजू चमकला!
6
रावेरचे माजी आमदार आर. आर. पाटील यांचे निधन
7
IND vs SA : लांब सिक्सर मारणाऱ्यापेक्षा रस्त्यावर पडलेला मॅच बॉल लांबवणाऱ्याची चर्चा (VIDEO)
8
मी शिवसेना सोडली तेव्हा ३५ आमदार, १५ खासदार माझ्याकडे आलेले...; राज ठाकरेंचा एकाच वाक्यात उद्धव, शिंदेंवर नेम
9
मिस्ट्री स्पिनरची जादू; दक्षिण आफ्रिकेच्या ताफ्यातील स्फोटक फलंदाज ठरले फुसका बार!
10
फुटबॉल सामन्यावेळी इस्रायली नागरिकांवर हल्ला; १२ जखमी, नेतन्याहूंनी नेदरलँडला विमाने पाठविली
11
Aiden Markram नं रुबाब दाखवला; पण Arshdeep Singh समोर तो फिका ठरला (VIDEO)
12
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : 'समोरासमोर चर्चेला तयार', पृथ्वीराज चव्हाणांचं अमित शाहांना खुलं चॅलेंज
13
Sanju Samson ची सेंच्युरी! एका डावात ३ खास रेकॉर्ड्सला घातली गवसणी
14
फक्त एक षटकार मारला त्यातही सुर्या भाऊची हवा! IPL मधील २१ कोटींचा सिक्सर किंग पडला मागे
15
जानेवारीमध्ये भाजपला मिळणार नवीन राष्ट्रीय अध्यक्ष; 22 नोव्हेंबरला दिल्लीत महत्वाची बैठक
16
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : महिलांबाबत अपमानास्पद वक्तव्यावर निवडणूक आयोग ॲक्शमोडवर,अधिकाऱ्यांना दिल्या कारवाईच्या सूचना
17
निमलष्करी दलाच्या अधिकाऱ्यांच्या रेशन मनी भत्त्याला कात्री; दर महिन्याला ४००० रुपयांचे नुकसान
18
कोणाचा फोटो लावायचा, हा आमचा निर्णय; मोदींचा फोटो न लावण्यावरुन नवाब मलिक स्पष्ट बोलले
19
"...तोपर्यंत त्यांचा निर्णय बदलणार नाही"; अजित पवारांना परत घेण्याबद्दल शरद पवारांचं विधान
20
जम्मू-काश्मीरच्या सोपोरमध्ये सैन्याची मोठी कारवाई; दोन दहशतवाद्यांचा खात्मा

नाशिकरोड परिसरात टवाळखोरांचा त्रास

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 27, 2018 12:50 AM

परिसरातील शाळा, महाविद्यालय, खासगी क्लासेस या ठिकाणी येणाऱ्या विद्यार्थिनींची टवाळखोर व रोडरोमिओंकडून छेडछाड केली जात आहे. यामुळे विद्यार्थिनींमध्ये भीतीचे वातावरण पसरले असून, रोडरोमिओंचा बंदोबस्त करावा, अशी मागणी निवेदनात करण्यात आली आहे.

नाशिकरोड : परिसरातील शाळा, महाविद्यालय, खासगी क्लासेस या ठिकाणी येणाऱ्या विद्यार्थिनींची टवाळखोर व रोडरोमिओंकडून छेडछाड केली जात आहे. यामुळे विद्यार्थिनींमध्ये भीतीचे वातावरण पसरले असून, रोडरोमिओंचा बंदोबस्त करावा, अशी मागणी निवेदनात करण्यात आली आहे.राष्टवादी विद्यार्थी कॉँग्रेसच्या वतीने उपनगरचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक प्रभाकर रायते यांना देण्यात आलेल्या निवेदनात म्हटले आहे की, परिसरातील शाळा, महाविद्यालय व खासगी क्लासेसमध्ये येणाºया विद्यार्थिनींची टवाळखोरांकडून छेडछाड केली जात असून, धूम स्टाईल गाड्या चालवून त्रास दिला जात आहे. शाळा, महाविद्यालय सुटण्याच्या व भरण्याच्या वेळेस पोलिसांची गस्त वाढवून टवाळखोरांचा बंदोबस्त करावा, अशी मागणी निवेदनात करण्यात आली आहे.  निवेदनावर राष्टÑवादी कॉँग्रेसचे योगेश निसाळ, संदीप टिळे, राजाभाऊ जाधव, जयप्रकाश गायकवाड, संकेत मुठाळ, संकेत देवरे, महेश सरोदे, आकाश पाळदे, प्रीतेश टिळे, महेश निंबेकर, आशिष गायखे, सनी निंबेकर आदींच्या सह्या आहेत.कारवाईची मागणीमारामाºयांचे प्रकारदेखील नित्याचेच झाल्याने विद्यार्थी वर्गात भीतीचे वातावरण पसरले आहे. टवाळखोरांकडून होणाºया छेडछाडीने विद्यार्थिनी त्रस्त झाल्या असून, विशेष करून ग्रामीण भागातील विद्यार्थिनी जास्त त्रस्त झाल्या आहेत. छेडछाडीकडे विद्यार्थिनी दुर्लक्ष करीत असल्याने टवाळखोरांचे फावते आहे.

टॅग्स :PoliceपोलिसNCPराष्ट्रवादी काँग्रेस