वणी : वणी-पिंपळगाव रस्त्यावर दि. २ एप्रिल रोजी लागलेल्या आगीत ७८ कांदा गुदामे व ३ कांदा शेड भक्ष्यस्थानी पडल्याने शेतकरी व व्यापारी वर्गापुढे कांदा साठवणुकीचा प्रश्न निर्माण झाला आहे. आगीच्या कारणाविषयी मतमतांतरे असली, तरी प्रशासकीय यंत्रनांनी अहवालपूर्तीसाठी दिलेल्या अग्रक्रमातून निष्कर्षापर्यंत पोहोचण्याची प्रतीक्षा आहे. दरम्यान, कोट्यवधी रुपयांचे नुकसान सोसून नुकसानग्रस्तांना गुदामे उभी करून देण्याचे आव्हान आहे. या सर्व द्राविडी प्राणायामात अडचण झाली ती कांदा खरेदी करून साठवणूक करणाऱ्या व्यापाºयांची. वणी-पिंपळगाव रस्त्यावर सुमारे दोनशे कांदा साठवणुकीची गुदामे व शेड आहेत. येथून परराज्यात व परदेशात कांदा विक्रीसाठी पाठवला जातो. येथे कांद्याची मोठी आर्थिक उलाढाल होते. पारदर्शी कारभार, बाजार समिती व्यापारी व कांदा उत्पादकांची सकारात्मक समन्वयात्मक भूमिका यामुळे खरेदी-विक्री प्रणालीचा नावलौकिक कायम आहे. स्थानिक व्यापाºयांबरोबर काही बाहेरील व्यापारी भाड्याने गुदामे घेऊन त्यात कांदा साठवितात. जागेच्या उपलब्धतेनुसार यात बदल करावा लागतो. सध्या उन्हाळ कांद्याची मोठया प्रमाणावर आवक सुरू आहे. टिकाऊपणा व साठवणक्षमता अशी वैशिष्ट्ये या कांद्याची असतात. एप्रिल ते नोव्हेंबर हा कालावधी कांदा साठवणुकीसाठी योग्य मानला जातो. या कालवधीत एका गुदामासाठी सुमारे ४१ हजार रुपये भाडे आकारले जाते.सध्या कांद्याची आवक मोठ्या प्रमाणावर होत असताना कांदा खरेदी करून ठेवायचा कोठे? असा प्रश्न व्यापाºयांना पडला आहे. आगीत जळालेले गुदाम दुरुस्तीसाठी वेळ लागणार आहे. काही व्यापाºयांची स्वत:ची गुदामे आहेत; मात्र ती भरल्यानंतर उर्वरित खरेदी केलेला माल ठेवायचा कुठे, अशी समस्येने व्यापाºयांना घेरले आहे. उन्हाळ कांदा विक्र ीची मोठी बाजारपेठ व्यापारी वर्गाच्या हातात आहे.
कांदा साठवणुकीस अडचण वणी : गुदामे, शेड भस्मसात झाल्याने व्यापारी अडचणीत
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 08, 2018 12:37 AM