नाशिक : कागदी पुरावे द्या, नाही तर धार्मिक स्थळ अनधिकृत अशी सूचना देत महापालिकेने गेल्यावर्षी राबविलेल्या मोहिमेत अनेक मंदिरे उद्ध्वस्त केली. त्यातील व्दारका, काठे गल्ली आणि गंगापूररोडवरील नरसिंहनगर येथील हनुमान मंदिरे हटविण्यात आल्याने एरव्ही उत्सव कालावधित भाविकांची गर्दी होणारा हा परिसर यंंदाही सुनासनाच होता. नियमित याठिकाणी दर्शन घेण्यासाठी जाणारे भाविकही यानिमित्ताने हळहळले. कोणेएकेकाळी प्रभू रामचंद्रांना वनवास घडल्यानंतर ते नाशिकच्या दंडकारण्यात वास्तव्याला होते. त्यामुळेच की काय परंतु नाशिकमध्ये रामभक्त हनुमानाची मंदिरे मोठ्या प्रमाणात होती. परंतु केवळ कायदेशीर त्रासातून हनुमानाची सुटका झाली नाही. त्यामुळे व्दारका चौफुली (देवळाली नाका) तसेच काठे गल्ली सिग्नल आणि नरसिंहनगरातील मंदिरेदेखील हटविण्यात आली आणि मूर्ती स्थलांतरित करून हनुमानालाच वनवास भोगावा लागत आहे. केवळ हनुमान मंदिरच नव्हे तर सर्वच रस्त्यात बाधीत असलेले आणि कित्येक तर रस्त्याला बाधीत नसलेल्या धार्मिक स्थळांना एकच न्याय लावण्यात आल्या. यातील अनेक धार्मिक स्थळे जुनी होती, परंतु केवळ १९९९ पूर्वीचा एखादा पुरावा नाही तसेच त्यावेळी ट्रस्टच नियुक्त नव्हता, स्थानिक नागरिक किंवा एखादे मित्रमंडळ त्याची देखभाल करीत होते, अशा सर्वच धार्मिक स्थळांना त्याचा फटका बसला आणि अखेरीस मूर्ती विधिवत काढून घेण्यास सांगण्यात आले आणि धार्मिक स्थळे हटविण्यात आली. शनिवारी (दि. ३१ मार्च) हनुमान जयंती उत्साहात साजरी करण्यात आली. परंतु ज्या ठिकाणी अशाप्रकारची मंदिरे हटविण्यात आली तेथे मात्र उत्साह नव्हता. उच्च न्यायालयाने रस्त्यातील धार्मिक स्थळ हटविण्याचे आदेश दिल्यानंतर कसेही सर्वेक्षण करून न्यायालयात यादी सादर करणाऱ्या तसेच सर्व धर्मियांची धार्मिक स्थळे हटविण्यासाठी तत्काळ कृती करणाºया महापालिका आणि राज्य शासनाने मात्र मद्यपानाची दुकाने स्थलांतरित होऊन महसूल बुडू नये यासाठी मोठा आटापिटा केला. महापालिका हद्दीत नसलेले राज्य महामार्ग हे बळजबरीने महापालिकेकडे हस्तांतरित केले. मात्र, धार्मिक स्थळांसाठी असा तोडगा काढण्यात आला नाही.मंगल कार्यालयांची अडचणव्दारका परिसरात दोन ते तीन मंगल कार्यालये असून तेथे विवाह सोहळ्यापूर्वी दर्शनासाठी नवरदेवाला नेले जात असे. नृरसिंहनगर परिसरातदेखील असाच प्रकार आहे. त्यामुळे आता अनेक मंगल कार्यालयांना हनुमान मंदिरांना पर्याय शोधावा लागला असून काही मंगल कार्यालयांनी आवारातच छोटेखानी हनुमान मंदिर साकारले आहे.
कायद्याचा त्रास अन् हनुमानाला वनवास मनपाची कारवाई : जन्मोत्सवाच्या दिवशी ‘तो’ परिसर सुनासुना
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 02, 2018 12:58 AM
नाशिक : कागदी पुरावे द्या, नाही तर धार्मिक स्थळ अनधिकृत अशी सूचना देत महापालिकेने गेल्यावर्षी राबविलेल्या मोहिमेत अनेक मंदिरे उद्ध्वस्त केली.
ठळक मुद्देभाविकांची गर्दी होणारा हा परिसर यंंदाही सुनासनाचअनेक धार्मिक स्थळे जुनी होती