सिन्नर : चालकाला सोमवारपर्यंत पोलीस कोठडीसिन्नर : जनावरांची निर्दयपणे कत्तल करून त्याची बेकायदेशीर मांस वाहतूक करणारा मालट्रक बजरंग दलाच्या कार्यकर्त्यांनी सिन्नर पोलिसांना पकडून दिला. त्यात सुमारे २५०० किलो (अडीच टन) जनावरांचे मांस असल्याचे आढळून आले. या प्रकरणी पोलिसांनी मालट्रक चालकाला अटक करून न्यायालयात हजर केल्यानंतर संशयितास सोमवारपर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली. शुक्रवारी पहाटे पावणेसहा वाजेच्या सुमारास नाशिककडून सिन्नरकडे येणारा मालट्रक (क्र. एमएच ०४ जीआर ३५९२) मधून पाणी ठिपकत असल्याने संशय आल्याने बजरंग दलाच्या दोघा कार्यकर्त्यांनी हॉटेल पंचवटीसमोर सदर ट्रक थांबविला. चालकाकडे चौकशी केल्यानंतर त्याने उडवाउडवीची उत्तरे दिल्याने कार्यकर्त्यांना संशय बळावला. त्यांनी सिन्नर पोलिसांना फोन करून घटनास्थळी पाचारण केले. पोलीस निरीक्षक राजेश शिंगटे यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक पोलीस उपनिरीक्षक रमेश निकम, हवालदार उदय पाठक, भगवान शिंदे, बी. व्ही. बोडके यांनी घटनास्थळी धाव घेतली. या मालट्रकमध्ये प्लॅस्टिकच्या ताडपत्रीखाली जनावरांचे मांस झाकलेले दिसून आले. त्यात बर्फाचे मोठ्या प्रमाणात तुकडे टाकण्यात आले होते. पोलिसांना जनावरांचे मांस वाहणारा मालट्रक व चालकाला ताब्यात घेतले. (वार्ताहर)
जनावरांचे मांस घेऊन जाणारा ट्रक पकडला
By admin | Published: November 18, 2016 11:12 PM