शहरं
Join us  
Trending Stories
1
लाडक्या बहिणींना वर्षाला देणार २५००० ; अजित पवारांची घोषणा, जाहीरनाम्यात काय काय?
2
"सत्ता गेली, तर कुत्र पण विचारणार नाही", मुख्यमंत्रिपदाच्या मुद्द्यावरून जयंत पाटलांनी फटकारलं
3
डोनाल्ड ट्रम्प अमेरिकेच्या ग्रामीण भागात 'सुपरहिट'; कमला हॅरिस यांचे प्रयत्न कमी पडल्याची चिन्हे
4
सुप्रीम कोर्टाचा मोठा निर्णय; तुमच्याकडे कारचं ड्रायव्हिंग लायसन्स असेल तर...
5
रुपाली भोसलेने Bigg Boss मधील 'या' स्पर्धकाची केली कानउघाडणी; म्हणाली, "का हा ॲटिट्युड?"
6
कंगना रणौतचा डोनाल्ड ट्रम्प यांना सपोर्ट, म्हणाली- "मी अमेरिकन असती तर..."
7
Sunita Williams : सुनीता विलियम्स यांच्यासह नासाच्या ३ अंतराळवीरांनी केलं मतदान; स्पेसमधून कसं दिलं जातं मत?
8
"आम्ही मुंब्राच काय, पाकिस्तानात शिवरायांचं मंदिर उभारू", संजय राऊतांचे देवेंद्र फडणवीसांना प्रत्युत्तर
9
सांगोल्यात शरद पवारांच्या राष्ट्रवादीत फूट; ठाकरेंच्या उमेदवाराला पाठिंबा की शेकापला साथ?
10
त्या घटनेच्या प्रतीला 'लाल' कव्हर, राहुल गांधींना अर्बन नक्षल्यांनी घेरलंय; फडणवीसांचा थेट हल्ला
11
IPL मेगा लिलावात उतरलाय कोच; त्याच्यावर बोली लावत CSK 'सुपर कॉम्बो'चा डाव साधणार? की...
12
Tulsi Vivah 2024 यंदा तुळशीचे लग्न कधी? ‘अशी’ सुरु झाली परंपरा; पाहा, मान्यता अन् महत्त्व
13
Bank Locker Charges : 'या' सरकारी बँकांनी वाढवले बँक लॉकर चार्जेस; आता किती द्यावे लागतील पैसे; तुमचा लॉकर आहे का?
14
मराठमोळी अभिनेत्री दीप्ती देवीचं घटस्फोटावर पहिल्यांदाच भाष्य; म्हणाली, "आजही माझं त्यांच्यावर..."
15
"ना शिवरायांनी सांगितलं, ना बाबासाहेबांनी सांगितलं, हे आत्ता सुरू झालं, कारण..."; 'संत' म्हणत राज यांचा पवारांवर हल्लाबोल
16
"माझा राजकीय अस्त करण्याची व्यूहरचना"; पंकजा मुंडेंच्या पराभवाचा उल्लेख, धनंजय मुंडे काय बोलले?
17
मंगलदेशा, पवित्रदेशा, नातेवाइकांच्याही देशा..., कुटुंबकबिल्याच्या विळख्यात महाराष्ट्राचं राजकारण
18
केंद्रीय गृहमंत्री अमित शाहांच्या प्रचार सभांचा धडाका; 'या' दिवशी पहिली सभा कोल्हापुरात
19
वृश्चिक संक्रांती: ७ राशींना लाभच लाभ, सरकारी नोकरीचे योग; उत्पन्नात वाढ, पैशांची बचत शक्य!
20
“लोकांची भावना तुतारीकडे…”; भाजपच्या सुरेश धस यांचं वक्तव्य: अजित पवारांवर साधला निशाणा!

सक्तीच्या ‘टोल’वसुलीमुळे ट्रक चालक हैराण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 07, 2017 1:24 AM

पिंपळगावहून ओझरला येताना टोल नाका ओलांडल्यानंतर वाहन तपासणीसाठी पोलिसांकडून ट्रक थांबविण्यात येत असल्याने ट्रकचालक त्रस्त झाले असल्याची भावना काही चालकांनी व्यक्त केली आहे. पोलिसांच्या या तपासणीला ट्रकचालक त्रस्त झाल्याची तक्रार करण्यात येत आहे.

ओझर : पिंपळगावहून ओझरला येताना टोल नाका ओलांडल्यानंतर वाहन तपासणीसाठी पोलिसांकडून ट्रक थांबविण्यात येत असल्याने ट्रकचालक त्रस्त झाले असल्याची भावना काही चालकांनी व्यक्त केली आहे. पोलिसांच्या या तपासणीला ट्रकचालक त्रस्त झाल्याची तक्रार करण्यात येत आहे.मुंबई-आग्रा महामार्गावरील निफाड तालुक्यातील सर्वात वर्दळीची दोन ठिकाणे आहेत. पिंपळगाव व ओझर दोन्ही ठिकाणी सहापदरीकरण अनेक वर्षांपासून रखडलेलेच असूनदेखील लांब पल्ल्याचे ट्रकचालक व अन्य माल वाहतूक करणारे आपल्या गाड्या कमी वेगात चालवून रस्ता ओलांडून वेग घेतात. तोच दोन्ही बाजूस कोकणगाव पिंपळगावच्या मध्यभागी टोलनाका आहे. येथे टोल भरणे अनिवार्य आहे. आधीच टोलचे दर बघून चक्रावले आहेत. बहुतांश मालवाहू गाड्यांना पुन्हा पोलिसांकडून अडविले जाते. कागदपत्रांची तपासणी करून पोलिसांना पैसे द्यावे लागत असल्याने ट्रकचालक त्रस्त झाल्याचे सांगतात. हा दुसरा टोल भरण्याची नामुष्की मोठ्या वाहनचालकांना येत असल्याची तक्रार ट्रकचालक करीत आहेत. वाहतूक पोलिसांच्या कठोर कारवाईमुळे वाहनचालक त्रस्त झाले आहेत. पिंपळगावपासून नाशिक, मुंबईच्या दिशेला जाणाºयांना याचा सर्वाधिक त्रास सहन करावा लागतो. सहापदरीमुळे वेग आटोक्यात आणून गाडी थांबविणे शक्य नसल्याने टोल भरल्यानंतर गाडी हळू असतानाच वाहतूक पोलीस सरळ दुचाकी आडवी लावत असल्याची तक्रार ट्रकचालकांनी केली आहे. यातील बहुतेक ट्रक महाराष्ट्राबरोबरच परराज्यातील असून, मालवाहू वाहनधारक त्रस्त असल्याचे चालक सांगतात.