निफाड : जवळील कादवा पुलावर ट्रकला हिंदोळा बसून ट्रक पुलाचा कठडा तोडून कादवा नदीपात्रात कोसळल्याने चालक जागीच ठार, तर चौघे जखमी झाले आहेत.बुधवारी सकाळी १०च्या सुमारास येवला येथे युरिया खताच्या गोण्या घेऊन निघालेला ट्रक (क्र. एमएच १५ एजी ७८०२) कादवा पुलावर हिंदोळा बसल्याने पुलाचे कठडे तोडून नव्या व जुन्या पुलाच्या मधोमध कोसळला. यात ट्रकचालक दशरथ उत्तम सांगळे (२७, वेहळगाव, ता. नांदगाव) यांचा जागीच मृत्यू झाला.घटना घडताच तातडीने नागरिक धावून आले व ट्रकमधून सांगळे यांचा मृतदेह बाहेर काढला. या अपघातात विलास शिवाजी केंद्रे (रा.जालना), सुका जनार्दन गवळी, उत्तम पंडित माळी, ताराबाई उत्तम माळी (रा. निफाड) जखमी झाले. ट्रकची धडक बसल्याने जुन्या पुलाचे कठडे पूर्णत: तुटले असून, ते त्वरित बसविण्याची मागणी नागरिकांनी केली आहे.याप्रकरणी पोलीस निरीक्षक विष्णू आव्हाड यांच्या मार्गदर्शनाखाली सपोनि व्ही. के. पठाडे, हवालदार शिवाजी माळी तपास करीत आहेत.
कादवा नदीपात्रात ट्रक कोसळून चालक ठार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 01, 2019 12:56 AM
निफाड : जवळील कादवा पुलावर ट्रकला हिंदोळा बसून ट्रक पुलाचा कठडा तोडून कादवा नदीपात्रात कोसळल्याने चालक जागीच ठार, तर चौघे जखमी झाले आहेत.
ठळक मुद्देट्रकचालक दशरथ उत्तम सांगळे (२७, वेहळगाव, ता. नांदगाव) यांचा जागीच मृत्यू झाला.