नाशिक : अमृतधाम येथील वाघ महाविद्यालय ते बळी मंदीरापर्यंत महामार्गावर रात्रीच्या सुमारास दरोडेखोरांची टोळी सक्रिय असल्याचे पुन्हा उघडकीस आले आहे. या टोळीने गुरुवारी (दि.३) मध्यरात्री ट्रकचालकास अडवून लूटमार केल्याची घटना घडली आहे.एक संशयास्पद रिक्षा (एमएम१५ झेड ३६३१)मधून पाच ते सहा दरोडेखोरांच्या टोळीने रिक्षाद्वारे ट्रकला ओव्हरटेक केले. पुढे रिक्षा आडवी लावून ट्रक थांबविली. ट्रकचालकास बळजबरीने खाली ओढत दमदाटी व धारधार शस्त्राचा धाक दाखवून त्याच्या जवळील रोख रक्कम, दोन मोबाईल घेऊन पळ काढला. ट्रकचालक जाफर हुसेन शेख (३०, शिवाजीनगर, धुळे) याने घटनेची माहिती पोलिस नियंत्रण कक्षाला कळविली. नियंत्रण कक्षातून बिनतारी संदेश मिळताच उपआयुक्त श्रीकृष्ण कोकाटे, पंचवटी पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरिक्षक दिनेश बर्डेकर, मुंबई नाका पोलीस ठाण्याचे सुनील नंदवाळकर, गुन्हे शाखा युनिट१चे पोलीस निरिक्षक नारायण न्याहाळदे आदिंनी घटनास्थळ गाठले. शेख याने दिलेल्या माहिती व संशयितांच्या वर्णन अणि रिक्षा क्रमांकावरून पोलिसांनी तत्काळ सर्वत्र नाकाबंदीच्या सुचना दिल्या. दरम्यान, रिक्षासह पाचपैकी चौघे दरोडेखोरांना अटक करण्यास पोलीसांना यश आले आहे. यामध्ये संजय जयप्रकाश निकम (४०,हिरावाडी), राहुल जगन्नाथ पाटील (२१ हनुमाननगर, आडगाव), प्रकाश मुरलीधर मुंडे (२३, तिडके कॉलनी), नीलेश प्रकाश पाटील (२२) यांचा समावेश आहे. त्यांचा एक साथीदार पसार आहे.
दरोडेखोरांच्या टोळीकडून ट्रकचालकाची लूट
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 03, 2017 4:48 PM
नाशिक : अमृतधाम येथील वाघ महाविद्यालय ते बळी मंदीरापर्यंत महामार्गावर रात्रीच्या सुमारास दरोडेखोरांची टोळी सक्रिय असल्याचे पुन्हा उघडकीस आले आहे. या टोळीने गुरुवारी (दि.३) मध्यरात्री ट्रकचालकास अडवून लूटमार केल्याची घटना घडली आहे.एक संशयास्पद रिक्षा (एमएम१५ झेड ३६३१)मधून पाच ते सहा दरोडेखोरांच्या टोळीने रिक्षाद्वारे ट्रकला ओव्हरटेक केले. पुढे रिक्षा आडवी लावून ...
ठळक मुद्दे मध्यरात्री ट्रकचालकास अडवून लूटमार पाच ते सहा दरोडेखोरांच्या टोळीने रिक्षाद्वारे ट्रकला ओव्हरटेक केलेट्रकचालकास बळजबरीने खाली ओढत दमदाटी व धारधार शस्त्राचा धाक जाफर हुसेन शेख याने घटनेची माहिती पोलिस नियंत्रण कक्षाला कळविली.