मालेगाव : मालेगाव तहसील आवारातून सोमवारी मध्यरात्री वाळूमाफियांनी पळवून नेलेल्या दहापैकी सहा ट्रक मनमाड व चोंढी शिवारातून छावणी पोलिसांनी जप्त केले आहेत. या प्रकरणी शुक्रवारी दोघा संशयित आरोपींना अटक केल्याने आरोपींची संख्या आता सहा झाली आहे, तर चार फरार संशयित आरोपींचा पोलीस पथक शोध घेत आहेत. पोलिसांनी जप्त केलेल्या वाळूच्या रिकाम्या ट्रक कॅम्प पोलीस ठाण्याच्या आवारात उभ्या करण्यात आल्या आहेत. अपर जिल्हाधिकारी लक्ष्मण राऊत व देवळ्याचे तहसीलदार कैलास पवार यांनी विनापरवानगी व बनावट पावत्यांच्या आधारे वाळू वाहतूक करणाऱ्या दहा ट्रक पकडल्या होत्या. सोमवारी मध्यरात्री वाळूमाफियांनी दंड न भरताच तहसील आवारातून ट्रक पळवून नेल्या होत्या. या प्रकरणी येथील छावणी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. पोलीस निरीक्षक इंद्रजित विश्वकर्मा, पोलीस उपनिरीक्षक राहुल पाटील, राहुल कोलते, नवनाथ कदम, शांतिलाल जगताप, अविनाश राठोड, मधुकर गांगुर्डे, पंकज भोये, अजय पगारे आदींच्या पथकाने पळवून नेलेल्या ट्रकचा शोध घेतला. दहापैकी सहा ट्रक मनमाड व चोंढी येथून शुक्रवारी जप्त करण्यात आल्या आहेत. तसेच समाधान चौधरी व ज्ञानेश्वर केसनोर या दोघा जणांना अटक करण्यात आली आहे. दरम्यान फरार असलेल्या संतोष बबन सांगळे रा. तामसवाडी, ता. निफाड, दत्तात्रेय निवृत्ती केसनोर रा. सातगाव धुळे, बळवंत संतोष पाटील, शिवाजी पांडुरंग पाटील दोघे रा. दह्याणे, ता.जि. धुळे या चौघा संशयितांचा शोध घेण्यास पोलीस पथक रवाना झाले आहेत. जळगाव जिल्हाधिकाºयांकडे टीपी व बनावट पावत्या तपासणीसाठी पाठविण्यात आल्या आहेत. जिल्हाधिकाºयांनी पावत्या बोगस असल्याचा अहवाल दिला तर संशयित आरोपींच्या कलमांमध्ये वाढ होण्याची शक्यता आहे.जप्त केलेल्या ट्रकचे क्रमांकछावणी पोलिसांनी मनमाड व चोंढी शिवारातून जप्त केलेल्या ट्रकचे क्रमांक पुढीलप्रमाणे : एमएच १८ एए ७२५९, एमएच १८ एए ८३५१, एमएच १८ बीए ७७२५, एमएच १८ एसी ८६८७, एमएच ४२ टी ०६८४, एमएच ४१ एजी ०९५७
मालेगाव तहसील आवारातून पळवून नेलेल्या ट्रक जप्त
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 24, 2018 1:08 AM