नैताळेच्या शेतकऱ्याची शक्कल : पत्रातून मांडल्या शेतकऱ्यांच्या व्यथासायखेडा: अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प आणि त्यांची पत्नी मेलनिया यांना निफाड तालुक्यातील नैताळे येथील शेतकºयाने गांधीटोपी, उपरणे, साडी व कांदे पाठवून शेतक-यांच्या व्यथा पत्रातून मांडल्या आहेत. अमेरिकेत कांदा निर्यात करावी अशीही विनंती केली आहे.ट्रम्प दांपत्य चोवीस आणि पंचवीस फेब्रुवारी रोजी दोन दिवस भारताच्या दौºयावर येत असून त्यांच्या जेवनाच्या मेजवानीत कांद्याचा वापर करावा यासाठी नैताळे येथील शेतकरी संजय साठे यांनी कांदे पाठवले आहे. सोबत एक पत्र, टोपी, शाल, आणि पत्नीसाठी साडी पाठवली आहे. त्यात महाराष्टÑाचा कांदा आरोग्यास कसा चांगला आहे याचे स्पष्टीकरण दिले आहे तर आपण अमेरिकेत कांदा निर्यात करावा आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना भारतातील शेतकºयांचे जीवनमान कसे उंचावेल, कर्जातून कसा मुक्त होईल यासाठी मोदींना सांगावे असे आवाहन ट्रॅम्प यांना केले आहे. साठे हे एक सामान्य शेतकरी असून अवघी दोन एकर शेती ते करतात. शेतात कांदा पिकाची लागवड दरवर्षी करत असतात. यंदा देखील कांद्याची लागवड केली आणि अवकाळी पावसामुळे कांद्याचे अतोनात नुकसान झाले. त्यामुळे उत्पादन घटले उत्पादन कमी झाल्याने कांद्याला चांगला भाव मिळेल अशी अपेक्षा त्यांना होती मात्र केंद्र सरकारने महाराष्टÑ राज्यातील कांद्यावर निर्यात बंदी केली.इतर देशांना सर्वाधिक कांदा महाष्टÑातील पसंत असूनही कांद्या निर्यात होत नाही. त्यामुळे भाव कोसळले आणि शेतकर्यांचा कांदा उत्पादनासाठी केलेला खर्च देखील वसूल होत नसल्याने साठे हवालदिल झाले. अमेरिकेच्या जनतेला कांदा खाण्यास योग्य आहे तो अगोदर तुम्ही खाऊन पहा आणि नंतर तोच कांदा अमेरिकेत पाठवा अशी विनंती मोदी यांना करून निर्यात बंदी उठवण्याचे आव्हान करा असे पत्र लिहून पाठवले आहे.------------------------------------------------शेतकरी कर्जबाजारीभारत हा कृषी प्रधान असून येथे शेतकºयांचे सर्वाधिक शोषण होत आहे. शेतीला हमी भाव मिळत नाही, स्वामिनाथन अयोग लागू होत नाही, खते ,बियाने यांच्या किमती कमी होत नाही त्यामुळे शेतकरी वर्षानुवर्षे कर्जबाजारी होत चालला आहे. या संदर्भात ट्रम्प यांनी भारत सरकारला मार्गदर्शन करावे असे आव्हान साठे यांनी केले आहे. साठे यांनी नुकतीच फास्ट पोस्टने कांदे आणि पत्र पाठवले आहे. त्यांच्या या संकल्पनेची केंद्र सरकार आणि अमेरिका सरकार कशी दखल घेते याकडे सर्वांचे लक्ष वेधले गेले आहे.-----------------------------महाराष्टÑ राज्याचा कांदा खाण्यास योग्य आहे की नाही आणि असेल तर अमेरिका आयात का करत नाही ? शिवाय पंतप्रधान नरेंद्र मोदी यानी निर्यातबंदी का केली याचे स्पष्टीकरण मिळावे. कांदा निर्यात करून शेतकºयांना दिलासा मिळावा म्हणून ट्रॅम्प यांना कांदा पाठून जेवणाच्या मेजवणीत खाण्याचे आवाहन केले आहे.-संजय साठे, शेतकरी, नैताळे
ट्रम्प दांपत्याला टोपी-उपरणे, साडी अन् कांदे !
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 15, 2020 2:19 PM