त्र्यंबकेश्वर : संत निवृत्तिनाथ समाधी संस्थानचे विरोधी व सत्तारुढ गटाचे विश्वस्त सभा संपल्यावर देवस्थान मालकीच्या जमिनीच्या मुद्द्यावर एकत्र येऊन नाशिक येथे बरोबरच कोर्टात गेले.संस्थानच्या मागील बैठकीत अध्यक्ष पंडितराव कोल्हे यांनी अध्यक्षपदाचा राजीनामा सादर केल्यानंतर अध्यक्षपदी पुंडलिकराव थेटे यांची वर्णी लागणार होती. मात्र ऐनवेळी अध्यक्षपद त्र्यंबकेश्वरचे पवनकुमार भुतडा यांना मिळाले. तसेच मी सचिवपदाचा राजीनामा दिला नसताना सचिवपदाची निवड बेकायदेशीरपणे झाल्याची ओरड करणाऱ्या जिजाबाई लांडे यांनी अध्यक्षांबरोबरच राजीनामा दिल्याचे पत्र अध्यक्ष पवनकुमार भुतडा यांनी पत्रकारांना दाखविले. त्यामुळे अध्यक्ष व सचिवपदाच्या राजीनामा नाट्यावर पडदा पडला. तसेच विरोधी गटातील विश्वस्तांचा गैरसमज दूर झाला. यामुळे बैठकीचा समारोप हसतखेळत झाला.निवृत्तिनाथ समाधी संस्थानची गट नं. १६० ही सुमारे साडेसहा एकर इनामी जमीन व दुसरी निवृत्तिनाथ मंदिरासमोरील पण सध्या संस्थानचे पुजारी गोसावी बंधू यांच्या नावावर असलेली सि.स.नं. ३५४ जागा ही प्रकरणे सध्या न्यायप्रविष्ट आहेत.निर्णयाचे अधिकारएकमेकांविषयी असणारे गैरसमज दूर झाले. विशेष म्हणजे संस्थानच्या वतीने विरोधकांतर्फे नियुक्त केलेल्या अॅड. घोटेकर यांच्या नावाला मान्यता देऊन कोर्टात जाणे व निर्णय घेण्याचे सर्वाधिकार ज्येष्ठ विश्वस्त त्र्यंबकराव गायकवाड, माजी सचिवजिजाबाई मधुकर लांडे व ज्येष्ठ विश्वस्त पुंडलिकराव थेटे यांना दिले आहेत.या वादात गोसावी कुटुंबाने स्पष्ट केले आहे की, कोर्ट जो निकाल देईल तो आम्हाला मान्य असेल.
संत निवृत्तिनाथ समाधी संस्थानचे विश्वस्त एकत्र
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 07, 2019 1:08 AM