सिन्नर : तालुक्यातील आदिवासी समाजबांधवांची आराध्य दैवत असणाऱ्या क्रांतिवीर राघोजी भांगरे, नरवीर उमाजी नाईक आदी क्रांतिकारकांचे संयुक्त शिल्पस्मारक सिन्नर नगरपालिकेच्या वतीने प्रस्तावित आहे. मात्र यासाठीचे तांत्रिक अडचणी अद्याप दूर होत नाहीत. स्मारकाचा हा विषय माझ्यासाठी जिव्हाळ्याचा असून वर्षभरात यासंबंधी अडचणी दूर करून स्मारक उभे करणार असल्याची ग्वाही आमदार राजाभाऊ वाजे यांनी दिली.जागतिक आदिवासी दिनानिमित्त हुतात्मा स्मारकात आयोजित आदिवासी मेळाव्यात आमदार वाजे बोलत होते. वसंतबाबा नाईक यांच्या अध्यक्षतेखाली आयोजित या मेळाव्यासाठी नगराध्यक्ष किरण डगळे, पंचायत समितीचे माजी गटनेते उदय सांगळे, तहसीलदार नितीन गवळी, पोलीस निरीक्षक मुकुंद देशमुख, पंचायत समितीच्या माजी सभापती सुमन बर्डे, उपनगराध्यक्ष शैलेश नाईक, नगरसेवक रुपेश मुठे, पंकज मोरे, विजया बर्डे, माजी नगरसेवक अशोक मोरे, लता हिले, दिलीप बिन्नर, दत्ता वायचळे आदी व्यासपीठावर उपस्थित होते.युवकांनी लक्ष वेधलेआदिवासी दिनाचे निमित्त साधून आयोजित मेळाव्यात आदिवासींच्या पारंपरिक संस्कृतीची झलक बघायला मिळाली. आदिवासी क्रांतिकारकांच्या वेशभूषेत आलेल्या तरुणांनी लक्ष वेधून घेतले. विविध नृत्यप्रकार यावेळी सादर करण्यात आले. लाठी चालवण्याचे प्रात्यक्षिक, डोक्यावर ज्वाला पेटून चहा उकळवण्याचा थरारक खेळ यावेळी दाखवण्यात आला. मान्यवरांच्या स्वागतवेळी पारंपरिक शस्त्र असणारा तिरकमठा भेट म्हणून देण्यात आला. कार्यक्रम आटोपल्यावर हुतात्मा स्मारक ते बसस्थानकापर्यंत रॅली काढण्यात आली.
क्रांतिकारकांचे संयुक्त शिल्पस्मारक उभारण्यासाठी प्रयत्न
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 10, 2018 6:12 PM
सिन्नर : तालुक्यातील आदिवासी समाजबांधवांची आराध्य दैवत असणाऱ्या क्रांतिवीर राघोजी भांगरे, नरवीर उमाजी नाईक आदी क्रांतिकारकांचे संयुक्त शिल्पस्मारक सिन्नर नगरपालिकेच्या वतीने प्रस्तावित आहे. मात्र यासाठीचे तांत्रिक अडचणी अद्याप दूर होत नाहीत. स्मारकाचा हा विषय माझ्यासाठी जिव्हाळ्याचा असून वर्षभरात यासंबंधी अडचणी दूर करून स्मारक उभे करणार असल्याची ग्वाही आमदार राजाभाऊ वाजे यांनी दिली.
ठळक मुद्देराजाभाऊ वाजे : सिन्नरला आदिवासी दिनानिमित्त मेळावा