नाशिक : राष्टÑीय स्वयंसेवक संघाचे सर कार्यवाह भय्याजी जोशी यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे नाव न घेता टीका केली आहे. पुढील वर्षी होणाऱ्या निवडणुकीत भाजपा देशात सत्तेवर येत नाही हे वास्तव असल्याने राष्टÑीय स्वयंसेवक संघाने मोदी यांनाच बळीचा बकरा बनविण्याची तयारी सुरू केली असल्याची टीका भारिप बहुजन महासंघाचे नेते अॅड. प्रकाश आंबेडकर यांनी केली आहे. शुक्रवारी (दि.१२) पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी इंधन दरवाढीच्या नावाखाली बोलविलेल्या बैठकीचा अजेंडा वेगळाच असून, त्याचा मूळ उद्देश कोणता आहे हे आपण दोन दिवसांत जाहीर करू, असा गौप्यस्फोटही त्यांनी केला आहे.आगामी सार्वत्रिक निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर अॅड. प्रकाश आंबेडकर यांनी उत्तर महाराष्टÑातील पदाधिकाºयांची आढावा बैठक नाशिक येथे घेतली. तत्पूर्वी शासकीय विश्रामगृहावर त्यांनी पत्रकारांशी बोलताना ही माहिती दिली.संघाचे ज्येष्ठ सरकार्यवाह भय्याजी जोशी यांच्या विधानावर आंबेडकर यांनी सडकून टीका करतानाच भय्याजी जोशी यांचे वक्तव्य म्हणजे संघाची भूमिका असल्याने प्रकाश आंबेडकर यांना आयतीच संधी मिळाली आणि त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना थेट हिटलरच्या पंक्तीत बसविले.भय्याजी जोशी यांच्या वक्तव्यामुळे मला हिटलरची आठवण झाली. हिटलरच्या सहकाºयांनीही हिटलरवर अविश्वास दाखवला होता, असा टोला लगावला. २०१९ मध्ये भाजपा सरकार सत्तेवर येणार नाही. ही संघाचीदेखील खात्री असल्यानेच त्यांनी पंतप्रधानांना बळीचा बकरा बनविण्याची तयारी केल्याचा तर्क त्यांनी मांडला.‘मी टू’ ही मोहीम चांगली; पण..‘मी टू’ ही मोहीम सध्या गाजत असून, त्यावर बोलताना अॅड. आंबेडकर यांनी ‘मी टू’मुळे महिला बोलायला लागल्या ही चांगली गोष्ट आहे. पुरुष प्रधान संस्कृती असताना महिला अत्याचाराबद्दल बोलताय ही चांगली गोष्ट आहे. मात्र काही महिला याचा दुरुपयोेग करीत असल्याचा आरोप त्यांनी केला. कायदा महिलांच्या बाजूने आहे. मात्र नाहक कोणाची कोणीही बदनामी करू नये, असेही ते म्हणाले.मंत्रिमंडळ विस्तार हे गाजरराज्यात होऊ घातलेला मंत्रिमंडळ विस्तार हे गाजर असल्याची टीका प्रकाश आंबेडकर यांनी केली. या मंत्रिमंडळात नव्याने एकाचाही समावेश होईल असे मला वाटत नाही, असेही ते म्हणाले.नोटबंदी किंवा सर्जिकल स्ट्राइक हे आम्ही सांगितलेले नाही. ती संघाची भूमिका असावी, असेही ते एका प्रश्नाच्या उत्तरात म्हणाले.नोटाबंदीचा मोठा फटका सर्वसामान्य नागरिकांना बसला, तर सर्जिकल स्ट्राइकची सत्यता वादग्रस्त ठरल्याने संघाने आपले हात झटकले असावे आणि मोदी यांनाच सर्वस्वी जबाबदार पकडून आपली प्रतिमा सांभाळण्याचा प्रयत्न केला असे सांगत त्यांनी संघ आणि मोदींवर टीका केली.राज्यातील राजकारणावर बोलताना त्यांनी राज्यातील परिस्थतीच कॉँग्रेसला फायदा घेत नाही असे सांगून कॉँग्रेसदेखील जातीचे सरकार असल्याचे ते म्हणाले. राज्यातील शेतकरी अडचणीत आहे. सरकारचे शेतकºयांना नाही तर व्यापाºयांना अभय आहे. सरकारच्या मर्जीने शेतकºयांची लूट होत असताना काँग्रेस त्याबाबत काहीही करू शकली नाही. मुळातच कॉँग्रेसने शेतकºयांसाठी काहीही केलेले नाही. यशवंतराव चव्हाण यांच्या वारसांनी कॉँग्रेसला मातीत गाडले, असेही ते म्हणाले.
नरेंद्र मोदी यांचा बळीचा बकरा बनविण्याचा प्रयत्न
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 13, 2018 1:17 AM
राष्टÑीय स्वयंसेवक संघाचे सर कार्यवाह भय्याजी जोशी यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे नाव न घेता टीका केली आहे. पुढील वर्षी होणाऱ्या निवडणुकीत भाजपा देशात सत्तेवर येत नाही हे वास्तव असल्याने राष्टÑीय स्वयंसेवक संघाने मोदी यांनाच बळीचा बकरा बनविण्याची तयारी सुरू केली असल्याची टीका भारिप बहुजन महासंघाचे नेते अॅड. प्रकाश आंबेडकर यांनी केली आहे.
ठळक मुद्देप्रकाश आंबेडकर : इंधन दरवाढीसाठीच्या बैठकीचा अजेंडा वेगळाच