सिन्नर : सिन्नर तालुका औद्योगिक सहकारी वसाहतीत (स्टाईस) ३७५ उद्योग सुरू असून, ४८ उद्योग बंदावस्थेत आहेत. त्यामुळे बंद पडलेले उद्योग सुरू करण्यास आमदार माणिकराव कोकाटे यांच्या सहकार्याने प्राधान्य देणार असल्याची ग्वाही प्रशासक मंडळाच्या अध्यक्ष सुधा माळोदे-गडाख यांनी दिली.
कोरोनामुळे बऱ्याच लोकांचा रोजगार हिरावला आहे. त्यामुळे स्थानिक तरुण उद्योजकांनी बंद उद्योग सुरू करण्यासाठी पुढे येऊन सक्रिय व्हावे, असे आवाहनही त्यांनी केले. स्टाईसवर अशासकीय प्रशासक मंडळ नियुक्त झाल्यानंतर प्रथमच अध्यक्ष माळोदे-गडाख, उपाध्यक्ष नारायण पाटील, सदस्य संजय शिंदे यांनी पत्रकार परिषद आयोजित करून प्रसारमाध्यमांशी संवाद साधताना कामांची रूपरेषा सांगितली.
आगामी काळातील ध्येय-धोरणांबाबतची भूमिका स्पष्ट केली. माजी अध्यक्ष अविनाश तांबे, उद्योजक रामदास दराडे, पंचायत समितीचे विरोधी पक्षनेते विजय गडाख, संस्थेचे व्यवस्थापक कमलाकर पोटे आदी उपस्थित होते.
दरम्यान, सामूहिक प्रोत्साहन योजनेंतर्गत आर्थिक फायदे घेतलेले, परंतु वर्षानुवर्षे बंद असलेले व पुन्हा कधीही सुरू होऊ न शकणाऱ्या बंद उद्योग घटकांची नवीन उद्योजकांस विक्री करून त्यांचे नावे हस्तांतरण करण्यासाठी जाचक असलेली पाच वर्षे प्रसामान्य उत्पादनामध्ये ठेवण्याच्या कालावधीची अट कमी करून लघुउद्योजकांसाठी तीन वर्षे, मध्यम व मोठ्या उद्योगांना फक्त पाच वर्षे व मेगा उद्योगांना सात वर्षे प्रसामान्य उत्पादनात असलेले सर्व बंद उद्योग घटक हस्तांतरणास परवानगी देण्यासाठीचा धोरणात्मक निर्णय घेऊन नवीन औद्योगिक धोरण २०१८ मध्ये समावेश करण्याकरिता उद्योग ऊर्जा व कामगार विभागाकडे पाठपुरावा सुरू असल्याचे माळोदे, पाटील व शिंदे यांनी सांगितले.
----------------------------
‘दवाखाना सुरू करण्याचा प्रयत्न’
ईएसआयसीचे हॉस्पिटल सुरू होण्यासाठी वेळ आहे. तथापि, एसएमबीटी हॉस्पिटल किंवा शिर्डी संस्थानच्या माध्यमाने कामगारांसाठी लवकरच दवाखाना सुरू करण्यात येणार असल्याची माहिती प्रशासक मंडळाने दिली. शिर्डी संस्थानला वसाहतीने जागा दिलेली आहे. त्यामुळे त्यांच्या माध्यमाने दवाखाना सुरू करू न कामगारांना मोफत औषधोपचाराची सुविधा उपलब्ध करण्यात येणार असल्याचे मंडळाने सांगितले.
----------------
फोटो ओळी- सिन्नर तालुका औद्योगिक वसाहतीच्या प्रशासकीय मंडळाच्या बैठकीत बोलताना अध्यक्ष सुधाताई माळोदे (गडाख). समवेत उपाध्यक्ष नारायण पाटील, सदस्य संजय शिंदे, विय गडाख, अविनाश तांबे, कमलाकर पोटे आदी. (१० सिन्नर ४)
100921\10nsk_11_10092021_13.jpg
१० सिन्रर ४