नाशिक : लोकसभा निवडणुकीची आचारसंहिता व पोलीस बंदोबस्ताच्या अभावामुळे नाशिक महापालिकेने स्थगित केलेली शहरातील अनधिकृत गोठे आणि लॉन्स व मंगल कार्यालयांवरील कारवाई पुन्हा सुरू करण्याचा निर्णय घेतला असून, सदरचे अतिक्रमण पोलीस बळाचा वापर करून काढून टाकण्यासाठी पोलीस बंदोबस्त मिळावा म्हणून पोलीस दलाला पत्र पाठविण्यात आले आहे. पहिल्या टप्प्यात नाशिक पूर्व विभागातील ३८ गोठ्यांवर अतिक्रमण विभागाचा हातोडा पडणार आहे.सदरची कारवाई सुरू करण्याबाबत सर्व कायदेशीर बाबी पूर्ण करण्यावर भर दिला जात असून, महापालिका आयुक्तांनी या संदर्भात संबंधित प्रमुखांना तशा सूचना दिल्या आहेत.पंचवटीतील तीन प्रकरणे नुकतीच नगररचनाकडून कारवाईसाठी अतिक्रमण विभागाकडे पाठविण्यात आली होती.२० गोठ्यांवर कारवाईमहापालिका नगररचना विभागामार्फत सदरचे अतिक्रमण काढण्यासाठी जोरदार तयारी चालविली असून, त्यासाठी अनधिकृत गोठे व लॉन्स, मंगल कार्यालयांच्या फाईली अतिक्रमण विभागाकडे पाठविण्यात आल्या आहेत. अतिक्रमण विभागाकडून नाशिकरोड विभागातील २० अनधिकृत गोठ्यांवर कारवाई करण्यात आली आहे.शासनाच्या नवीन नियमानुसार लॉन्स व मंगल कार्यालयांच्या चार बाजूंनी मोकळी जागा व पार्किंगची जागा सोडण्यास सांगण्यात आले आहे. शहरातील ८७ लॉन्सपैकी ४१ लॉन्स अनधिकृत ठरवित त्यांना नगररचना विभागाकडून यापूर्वीच नोटिसा बजावण्यात आल्या आहेत. यात सर्वाधिक लॉन्स नाशिकरोड व नाशिक पूर्व विभागात आहेत. यातील काही लॉन्सला अंतिम नोटिसा देण्याचे काम नगररचना विभागाने केले आहे.
मंगल कार्यालये, लॉन्सवर पुन्हा हातोडा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 14, 2019 1:55 AM