नाशिक : महापालिका आयुक्त तुकाराम मुंढे आणि लोकप्रतिनिधी यांच्यातील संघर्ष सुरूच आहेत. महासभेत मुंढे यांना टोमणे, तर आयुक्तांकडून काही पदाधिकाऱ्यांना केली जाणारी परतफेड सुरू असतानाच आयुक्तांना महासभेत महापौरांच्या आदेशावरून बोलण्यावरून शाब्दिक वादही झडले.महापालिकेची महासभा सोमवारी (दि.१९) पार पडली. यांसपूर्ण सभेत सभागृहनेता दिनकर पाटील यांनी आयुक्तांना गोड बोलून टोमणे लावले. मुंडे यांच्यासमोर अधिकारी बोलत नाहीत, आयुक्तांना ते खूप घाबरतात, कोणताही प्रश्न विचारला की आयुक्तांकडे बघूनच, मग आयुक्त काय बोलले तेच बोलतात असे सांगताना स्वागत हाइटच्या पाणीपुरवठ्यावर सुरू असताना आयुक्तांना तुम्ही मोठेपणा घ्या नाराज होऊ नका. साहेब, तुम्ही भगवत गीता वाचा असा सल्ला दिला. त्यावर आयुक्तांनी मी एकदा नव्हे तर चार वेळा गीता वाचली आहे, असे सांगितले.मुंढे साहेब,निर्माणकर्ते व्हा...अजय बोरस्ते यांनी बेकायदेशीर मिळकतींच्या मुद्द्यावर बोलताना आयुक्त तुकाराम मुंढे यांना कंस्ट्रक्टीव्ह व्हा, डिस्ट्रक्टीव्ह नको असा सल्ला दिला. मोडतोड कोणीही करेल परंतु निर्माणकर्ते व्हा, असे सांगितले. व्टीटरच्या माध्यमातून सवंग लोकप्रियता आणि खुशमस्कºयांचे लाईक याबाबतही बोरस्ते यांनी टोमणा लगावला, त्यावर आयुक्तांनी मी प्रसिद्धीसाठी हे सर्व करतो असे तुम्हाला का वाटते, असा प्रश्न केला.राजीव गांधी भवनच बेकायदा तर मग...बेकायदा मिळकतींच्या विषयावर दिनकर पाटील यांनी प्रश्नोत्तरे करताना राजीव गांधी भवनची इमारत १९९३ मध्ये बांधण्यात आली, त्यानंतर या इमारतीत अनेक फेरबदल करण्यात आल्याने ही इमारतच बेकायदेशीर नाही काय असा प्रश्न केला आणि प्रशासनाला मौनात जावे लागले. कोणत्याही इमारतीवर बांधकाम करणे, तसेच मंजूर बांधकामात फेरबदल किंवा वापरातील बदल म्हणजे बेकायदेशीर बांधकाम अशी कायद्यातील व्याख्या आयुक्त तुकाराम मुंढे यांनी केली होती त्यावर पाटील यांनी हा प्रश्न करून अडचणीत आणले. महापालिकेचे पश्चिम विभागीय कार्यालय असलेल्या पंडित कॉलनीतील इमारतीतदेखील अनेक फेरबदल करण्यात आल्याने तीदेखील बेकायदेशीर असल्याचे पाटील यांनी सांगितले. तर राजीव गांधी भवन हे नालाबंदिस्त करून त्यावर बांधण्यात आल्याकडे डॉ. हेमलता पाटील यांनी लक्ष वेधले.आयुक्तांची नाराजीमहापालिकेत सकाळी माजी पंतप्रधान स्व. इंदिरा गांधी यांच्या जयंतीनिमित्ताने अभिवादनाच्या कार्यक्रमाच्या वेळी आयुक्त तुकाराम मुंढे लोकप्रतिनिधींसमवेत छायाचित्र काढण्यास उत्सुक नव्हते असे दिनकर पाटील यांनी खास शैलित सांगितल्यानंतर, आपण याठिकाणी उपस्थित झाल्यानंतरही लोकप्रतिनिधींनी प्रोटोकाल न पाळता परस्पर प्रतिमेला पुष्पहार घातल्याचे सांगून नाराजी व्यक्त केली.
तुकाराम मुंढे-नगरसेवकांची जुगलबंदी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 20, 2018 10:52 PM
महापालिका आयुक्त तुकाराम मुंढे आणि लोकप्रतिनिधी यांच्यातील संघर्ष सुरूच आहेत. महासभेत मुंढे यांना टोमणे, तर आयुक्तांकडून काही पदाधिकाऱ्यांना केली जाणारी परतफेड सुरू असतानाच आयुक्तांना महासभेत महापौरांच्या आदेशावरून बोलण्यावरून शाब्दिक वादही झडले.
ठळक मुद्देकौतुक आणि टोमणेही : महासभेत बाजू मांडण्यावरून चकमक