नाशिक : जुने नाशिकमधील कथडा येथील महापालिकेच्या डॉ. झाकीर हुसेन रुग्णालयामधील वैद्यकिय व्यवस्थेला तातडीने सशक्त करण्यात येणार असल्याचे आश्वासन महापालिका आयुक्त तुकाराम मुंढे यांनी प्रभागाच्या नगरसेवक समीना मेमन यांना दिले. महापालिकेच्या रुग्णालयांमध्ये सर्वाधिक ढिसाळ व सलाईनवर असलेले रुग्णालय झाकीर हुसेन असल्याचे मुंढे यांनीही मान्य केले.झाकीर हुसेन रुग्णालय नेहमी चर्चेत राहत आले आहे. त्याला केवळ महापालिकेच्या आरोग्य विभागाचा गलथान कारभार कारणीभूत ठरलाआहे. औषधांचा तुटवडा, अपुरे वैद्यकिय कर्मचारी वर्ग, अस्वच्छता, पिण्याच्या पाण्याचीही सुविधा नाही आणि डॉक्टरांचा हलगर्जीपणा यामुळे हे रुग्णालय नेहमीच प्रशासनाच्या चौकशीच्या फेऱ्यात आणि लोकप्रतिनिधींच्या टीकेचे धनी राहिले आहे. आठवड्यापुर्वी वडाळागाव परिसरातील एका गर्भवती महिलेच्या प्रसुतीबाबत येथील वैद्यकिय कर्मचा-यांसह डॉक्टरांनी उदासिनता दाखविल्यामुळे नवजात बाळाचा मृत्यू झाल्याचा आरोप त्या महिलेच्या कुटुंबियांनी केला आहे. या प्रकारानंतर पुन्हा झाकीर हुसेन रुग्णालयातील अनागोंदी कारभार आणि वैद्यकिय व्यवस्था चव्हाट्यावर आली. याबाबत मेमन यांनी तातडीने मुंढे यांची भेट घेऊन याप्रकरणी सखोल चौकशीसह या रुग्णालयाचा कारभार सुधारण्याची मागणी केली. दरम्यान, मुंढे यांनी याप्रकरणी गंभीर दखल घेत वैद्यकिय अधिका-यांना हुसेन रुग्णालय प्रसूती प्रकरणाची सखोल चौकशी करण्याचे आदेश दिले आहे. वैद्यकिय अधिकारी डॉ. जयराम कोठारी यांनी तत्काळ चौकशी अधिकारी म्हणून डॉ. प्रशांत शेटे यांची नियुक्ती केली.दरम्यान, मेमन यांनी त्यांच्या प्रभागातील मुलतानपुरा मनपा शाळा, बडी दर्गा मनपा शाळा, आंबेडकर उद्यान, सार्वजनिक स्वच्छता, रस्त्यांची दुरवस्था अशा विविध समस्यांचे गा-हाणे मुंढे यांच्याकडे केले. यावेळी त्यांनी अधिका-यांमार्फत जुने नाशिकच्या गावठाणमधील समस्या सोडविण्यात येणार असून तसे आदेश संबंधित विभागाला दिल्याचे मेमन म्हणाल्या.‘त्या’ शाळेच्या इमारतीला निधी१९६१सालापुर्वीची जुन्या नाशकातील मुलतानपुरा येथील शाळेची इमारत अत्यंत जीर्ण झाली असून याच इमारतीत महापालिकेची प्राथमिक शाळेचे वर्ग भरविले जातात. यामुळे दुर्घटना घडण्याची भीती व्यक्त होत असल्याचे मेमन यांनी निदर्शनास आणून दिले. सर्वसाधारण कामाच्या निधीमधून या इमारतीचे बांधकाम करण्यास मुंढे यांनी मान्यता दिली आहे. कारण अडीच कोटींचा निधी शिक्षण मंडळासाठी मंजूर असून त्यामधून नवीन इमारत बांधण्यास त्यांनी मंजुरी दिली. तसेच कथड्यामधील डॉ. सुमंत नाईक उर्दू शाळेच्या नुतनीकरणासाठीही निधी उपलब्ध करुन दिला जाणार असल्याचे त्यांनी सांगितले.
तुकाराम मुंढे : झाकीर हुसेन रुग्णालयाची वैद्यकिय सुविधा सुधारणार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 18, 2018 2:23 PM
मुंढे यांनी याप्रकरणी गंभीर दखल घेत वैद्यकिय अधिका-यांना हुसेन रुग्णालय प्रसूती प्रकरणाची सखोल चौकशी करण्याचे आदेश दिले आहे. वैद्यकिय अधिकारी डॉ. जयराम कोठारी यांनी तत्काळ चौकशी अधिकारी म्हणून डॉ. प्रशांत शेटे यांची नियुक्ती केली.
ठळक मुद्देहुसेन रुग्णालय प्रसूती प्रकरणाची सखोल चौकशी करण्याचे आदेश दिले ‘त्या’ शाळेच्या इमारतीला निधी