सटाणा : मध्ययुगीन काळातील संतांचे कार्य अनन्यसाधारण आहे. संतांचे हे भक्ती आंदोलन होते. भक्तीचाच आधार घेत पांडुरंगाला प्रतीक मानून जातीय व्यवस्था, वर्णव्यवस्था, अस्पृश्यता व उच्च-निच्चता नष्ट करण्याचा क्र ांतिकारक पवित्रा त्या चळवळीच्या माध्यमातून समाजजागृती करून समतावाचक व्यवस्था निर्माण करण्याचे काम ज्यांनी केले, त्यात तुकोबा अग्रस्थानी होते, असे प्रतिपादन वैनतेय विद्यालयाचे प्रा.बाळासाहेब ठोके यांनी येथे केले.येथील देवमामलेदार श्री यशवंतराव ‘साहित्यायन’ संस्थेतर्फे संत तुकाराम महाराज बिज निमित्त कार्यक्र मात प्रमुख व्याख्याते म्हणून ते बोलत होते. महाराष्ट्र शासनाच्या मराठी भाषा सल्लागार समितीचे अध्यक्ष, साहित्यायनचे अध्यक्ष डॉ. दिलीप धोंडगे, प्रा. हितेंद्र आहेर, पोलीस उपविभागीय अधिकारी शशिकांत शिंदे, देवस्थानचे अध्यक्ष भालचंद्र बागड, समन्वयक डॉ. व्ही. डी. पाटील, डॉ. एकनाथ पगार, साहित्यायनचे सचिव बा. जि. पगार आदि प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते.शासनाच्या मराठी भाषा सल्लागार समितीच्या अध्यक्षपदी निवड झाल्याबद्दल डॉ. दिलीप धोंडगे, भाषा सल्लागार सदस्यपदी डॉ. एकनाथ पगार तर समाज भूषण पुरस्कार मिळाल्याबद्दल भालचंद्र बागड यांचा नागरी सत्कार करण्यात आला. कार्यक्र माचे प्रास्ताविक बा. जि. पगार यांनी केले. प्रारंभी वारकरी संप्रदायाचे पंडित शेवाळे यांच्या नेतृत्वाखाली चौगाव भजनी मंडळाने गाथा भजन सादर केले. या प्रसंगी डॉ. शुभदा माजगावकर, रविंद्र भदाणे, सीमा सोनवणे, अॅड. सोमदत्त मुंजवाडकर, अॅड. सतीश चिंधडे, प्रा. सुनील बागुल, केदा ठाकरे, पांडुरंग सावळा, सोपान खैरनार, किरण दशमुखे, मधुकर बच्छाव, अनिता देवरे आदी उपस्थित होते. ज्योती जाधव यांनी सूत्रसंचालन तर प्रा.शं. क. कापडणीस यांनी आभार मानले.
समाजजागृती, समतावाचक व्यवस्था निर्माण करण्यात तुकोबा अग्रस्थानी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 26, 2019 9:39 PM
सटाणा : मध्ययुगीन काळातील संतांचे कार्य अनन्यसाधारण आहे. संतांचे हे भक्ती आंदोलन होते. भक्तीचाच आधार घेत पांडुरंगाला प्रतीक मानून जातीय व्यवस्था, वर्णव्यवस्था, अस्पृश्यता व उच्च-निच्चता नष्ट करण्याचा क्र ांतिकारक पवित्रा त्या चळवळीच्या माध्यमातून समाजजागृती करून समतावाचक व्यवस्था निर्माण करण्याचे काम ज्यांनी केले, त्यात तुकोबा अग्रस्थानी होते, असे प्रतिपादन वैनतेय विद्यालयाचे प्रा.बाळासाहेब ठोके यांनी येथे केले.
ठळक मुद्देठोके : ‘साहित्यायन’ तर्फे संत तुकाराम महाराज बिज कार्यक्र म