देशमाने : येथील क्र ांतीगुरु सोशल फाउंडेशन व साई झंकार ब्रास बँड यांच्या वतीने तुलशी विवाह पारंपरिक पद्धतीने अतिशय आनंदात साजरा करण्यात आला.नाशिक-औरंगाबाद महामार्गा लगत येवला तालुक्यातील देशमाने या गावांत क्र ांतीगुरु सोशल फाउंडेशनचे नाशिक युवा जिल्हाध्यक्ष संजय खैरनार यांनी हा विवाह सोहळा आयोजित केला होता. अतिशय सुंदर व उत्साही वातावरणात वधु तुलशी वृंदावनाला साडी, चोळी, नथ, बांगड्या, जोडवे, मणिमंगळसूत्र या सर्व वस्तुनी तुलशी वृंदावनाला सजवलेले होते. वराच्या जागी भगवान कृष्णाची मूर्ती ठेऊन सजवले होते. वधु माता पित्याचा मान हा संजय खैरनार व सौ. दिपाली खैरनार यांना व वधुचे मामा भगवान खरात व वराचे मामा रविंद्र खैरनार यांना मिळाला.या विवाह सोहळयात गावातील जेष्ठ नागरिक,तरु ण मंडळ,व ग्रामस्थ हे वºहाडीच्या रूपाने वेळेवर हजर झाले होते.त्यात प्रथमत: भगवान श्रीकृष्ण मुर्तीची डी जे च्या तालावर मिरवणूक काढण्यात आली. त्यानंतर पारंपरिक पद्धतीने मंगल अष्टके गायल्यानंतर वर्हाडीनी आशीर्वाद रूपी अक्षदांचा वर्षाव केला. लग्न लागल्या नंतर ढोल-ताशाच्या व फटाक्यांच्या आतिश बाजीने हा सोहळा मोठ्या आनंदाने साजरा करण्यात आला.दरम्यान संजय खैरनार यांनी या पारंपारिक उत्सवाचे महत्व सर्व ग्रामस्थांना आपल्या विचारातून सांगितले.या प्रसंगी गावातील शरद गोरे,भारत काळे,विनोद बागुल,चंद्रकांत खैरनार सह इंदुबाई खैरनार,कल्पना खैरनार,ताईबाई खैरनार.कौशाबाई खैरनार ,अंजनाबाई खैरनार,गंगूबाई खैरनार आदीसह मोठ्या संख्येने ग्रामस्थ उपस्थित होते.कार्यक्र माचे सूत्र संचालन हे प्रताप खैरनार यांनी केले.
देशमाने येथे तुलसीविवाह उत्साहात
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 12, 2019 6:35 PM
देशमाने : येथील क्र ांतीगुरु सोशल फाउंडेशन व साई झंकार ब्रास बँड यांच्या वतीने तुलशी विवाह पारंपरिक पद्धतीने अतिशय आनंदात साजरा करण्यात आला.
ठळक मुद्देसोहळा मोठ्या आनंदाने साजरा करण्यात आला.