जळगाव नेऊर : मानव हा जन्म एकदा प्राप्त होतो. कर्म करावे लागतात. मात्र कर्म करताना ते समाज उपयोगी असावे. आपल्या हातातून उत्तम कर्म होण्यासाठी आपण राम कथा, कृष्ण कथा श्रवण केल्या पाहिजेत. आपल्या जीवनात रामकथेचे आचरण करावे, असे महामंडलेश्वर स्वामी शिवगिरी महाराज यांनी चिचोंडी येथील रामेश्वर महादेव मंदिराच्या वर्धापन दिनानिमित्त व जनार्दन स्वामीच्या तिसाव्या पुण्यस्मरणार्थ तुलशी राम कथा सोहळा व जनार्दन स्वामी जीवन चिरत्र व ज्ञानेश्वरी पारायण कार्यक्र मात कथेचे निरु पण करत होते.पालखी मिरवणुकीने स्वामी शिविगरी महाराज यांचे स्वागत करून जनार्दन स्वामी आश्रमापासून ते मंदिरापर्यंत मिरवणुक काढण्यात आली. रविवारी रात्री शंकर व पार्वती यांचा विवाह समारंभ पार पडला.शंकराच्या वेशात गौरव राजगुरू, पार्वतीच्या वेशात प्रसाद मढवई होते. गुरुवारी (दि. ३०) सायंकाळी सात ते आठ या वेळेत स्वामी शिवगिरी महाराज यांचे प्रवचन होऊन महाप्रसादाने कार्यक्र माची सांगता होणार आहे.कार्यक्र म यशस्वीतेसाठी तानाजी गोसावी, ज्ञानेश्वर मढवई, रमेश राजगुरू, सदाशिव कुलकर्णी, चंद्रभागा मढवई, पुंडलिक मढवई, सुभाष मढवई, पुंजाराम मढवई, मुकेश पवार, अजय मढवई, समाधान मढवई, कृष्णा जाधव, आण्णा जाधव, बाबासाहेब जाधव, राजेश्वर मित्र मंडळ व जय बाबाजी भक्त परिवार परिश्रम घेत आहेत.
चिचोंडीत तुलशी रामकथा सोहळा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 29, 2020 6:31 PM
जळगाव नेऊर : मानव हा जन्म एकदा प्राप्त होतो. कर्म करावे लागतात. मात्र कर्म करताना ते समाज उपयोगी असावे. आपल्या हातातून उत्तम कर्म होण्यासाठी आपण राम कथा, कृष्ण कथा श्रवण केल्या पाहिजेत. आपल्या जीवनात रामकथेचे आचरण करावे, असे महामंडलेश्वर स्वामी शिवगिरी महाराज यांनी चिचोंडी येथील रामेश्वर महादेव मंदिराच्या वर्धापन दिनानिमित्त व जनार्दन स्वामीच्या तिसाव्या पुण्यस्मरणार्थ तुलशी राम कथा सोहळा व जनार्दन स्वामी जीवन चिरत्र व ज्ञानेश्वरी पारायण कार्यक्र मात कथेचे निरु पण करत होते.
ठळक मुद्देरामेश्वर महादेव मंदिर वर्धापन दिनानिमित्त कार्यक्रम