सिन्नर : तालुक्याच्या पूर्व भागात पांगरी शिवारात सोमवारी (दि.२७) दुपारी जुन्या पंचाळे रस्त्यावर व मिठसागरे शिवारात अर्धा तास मुसळधार ढगफुुटीसदृश पाऊस झाला. यावेळेत सर्वत्र पाणीच पाणी झाले होते.सोमवारी दुपारी २ वाजेच्या सुमारास पांगरी शिवारात अभंग मळा, पांगरी-पंचाळे शिवारातील जाधव मळा, पांगरी-मिठसागरे शिव या भागात मुसळधार पाऊस सुरू झाला. अवघ्या अर्ध्या तासात प्रत्येक शेतात पाणी साचले होते. रस्त्याने काहीच दिसत नव्हते. जनावरांचे मोठ्या प्रमाणात हाल झाले. अक्षरश: ढगफुटीसदृश पाऊस झाल्याने ओढे-नाले दुथडी भरून वाहत असल्याचे चित्र होते.
या पावसाने भारत बाबासाहेब पांगारकर यांच्या शेताजवळ असलेला बंधारा ओव्हरफ्लो झाला. दरम्यान, गेल्या चार दिवसांपासून सिन्नरच्या पूर्व भागात समाधानकारक पाऊस होत असल्याने शेतकरी सुखावला आहे. पेरण्यायोग्य पाऊस झाल्याने लवकरच शेतकरी पेरण्या करतील असे चित्र आहे. अनेकांच्या शेतात अजून पाणी असल्याने पेरणीयोग्य जमीन झाल्यानंतर पेरण्यांना वेग येईल.अर्धा तासात नाले-ओढे एकसिन्नर तालुक्याच्या पूर्व भागातील पांगरी शिवारात दुपारी दोन वाजेच्या सुमारास ढगफुटीसदृश पाऊस झाला. पांगरी, पंचाळे, मिठसागरे या गावांच्या शिवांवर झालेल्या पावसाने शेतात पाणी साचले होते. पांगरी शिवारातील गणपत अभंग यांच्या शेतातील व बंधाऱ्यातील पाणी विहिरीचा कथडा तोडून विहिरीत कोसळले. अवघ्या काही मिनिटांत तळ काढलेली कोरडी विहिरी तुडुंब भरल्याचे चित्र होते.घोटीसह इगतपुरीला पावसाने झोडपलेघोटी : दमदार पावसाच्या प्रतीक्षेत असलेल्या इगतपुरी तालुक्यातील बहुतांश भागाला दमदार पावसाने चांगलेच झोडपले. घोटी परिसरासह ग्रामीण भाग व पूर्व भागातही या पावसाने जोरदार हजेरी लावली. पावसाच्याच तालुक्यात रुसला पाऊस असे म्हटले जात असतानाच सोमवारी मात्र पावसाने दोन तास का होईना चांगली हजेरी लावली. इगतपुरी, घोटीसह ग्रामीण भाग व पूर्व भागात दुपारच्या सुमारास जोरदार पाऊस झाला. रविवारीही पूर्व भाग व टाकेद परिसरातही जोराचा पाऊस झाल्याने नाले चांगलेच वाहू लागले होते. पूर्व भागात यावेळी पावसाची चिंताजनक स्थिती होती. मात्र दमदार पावसाने शेतकऱ्यांना चांगला दिलासा मिळाल्याचे चित्र दिसत होते.फोटो - २७ पांगरी वॉटरसिन्नर तालुक्याच्या पांगरी शिवारात पावसामुळे गणपत अभंग यांची तुडुंब भरलेली विहीर.