घोटी : गेली पंचवीस वर्षांपासून शिवसेनेकडे एकहाती सत्ता असणाºया इगतपुरी नगरपालिकेचा कार्यकाल संपुष्टात येत असल्याने येत्या दोन महिन्यात होणाºया आगामी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर इगतपुरी शहराचे राजकीय वातावरण निवडणुकीपूर्वी तापू लागले आहे. शहरातील मतदारात आपल्या पक्षाची प्रतिमा आचारसंहितेपूर्वी निर्माण करण्यासाठी सर्वच राजकीय पक्ष विविध क्लृप्त्या लढवत असून, यात सत्ताधारी शिवसेनेबरोबर भाजपानेही आघाडी घेतली असल्याचे दिसून येते.जागतिक दर्जाच्या विपश्यना केंद्रामुळे संपूर्ण जगात ओळख असणाºया इगतपुरी नगरपालिकेचा कार्यकाल संपत येत असल्याने, येत्या दोन महिन्यात या नगरपालिकेची पंचवार्षिक निवडणूक होत आहे. या निवडणूक आचारसंहिता लागण्यापूर्वी सर्वच राजकीय पक्षांनी वातावरण निर्मिती व राजकीय व्यूहरचना आखण्यास सुरुवात केली आहे. गेली पंचवीस वर्षांपासून अखंडपणे एकहाती सत्ता असणाºया शिवसेनेने ही नगरपालिका पुन्हा ताब्यात घेण्यासाठी कंबर कसली असून, नगराध्यक्ष पदापासून अठरा नगरसेवकासाठी इच्छुक उमेदवाराची चाचपणी सुरू केली आहे तर याबाबत केंद्रात आणि राज्यात सत्ता असलेल्या भाजपानेही या निवडणुकीत आपली प्रतिष्ठा पणाला लावली आहे. भाजपने इच्छुक उमेदवाराच्या मुलाखती पार पडल्या आहेत तर मागील निवडणुकीत एकही जागा न मिळविणाºया काँग्रेस पक्षावर ऐनवेळी उमेदवार शोधण्याची केवलवाणी वेळ येणार आहे तर प्रबळ विरोधी पक्षाची भूमिका बजावणाºया राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अनेक मातब्बर पदाधिकारी ऐन निवडणुकीच्या तोंडावर इतर पक्षात गेल्याने पक्षात मोठी पोकळी निर्माण झाली असल्याचे दिसून येते. या निवडणुकीपूर्वी सत्तांतर करण्याचे प्रकार मोठ्या प्रमाणात घडले. यात राष्ट्रवादीचे फिरोज पठाण यांनी राष्ट्रवादीचा त्याग करीत भाजपामध्ये प्रवेश केला. ते नगराध्यक्षपदाचे प्रबळ दावेदार मानले जातात तर राष्ट्रवादीचे यशवंत दळवी यांनीही भाजपात प्रवेश करून प्रवाहाबरोबर जाणे पसंत केले तर काँग्रेसचे व आमदार निर्मला गावित यांचे खंदे समर्थक समजले जाणारे किरण फलटणकर हेही भाजपाच्या डेºयात सहभागी झाले. यामुळे भाजपाची शहरातील ताकद वाढल्याचे बोलले जाते. दरम्यान शहरातील निर्णायक मतदार म्हणून समजल्या जाणाºया दलित समाजात या निवडणुकीत दुहीचे राजकारण पाहण्यास मिळणार आहे. केंद्रात आणि राज्यात रिपाइं भाजपाबरोबर असताना मात्र शहरातील रिपाइंचा एक गट शिवसेनेबरोबर जाणार असल्याचे समजते. यामुळे दलित मतांचा फायदा नेमका कोणाला? हे मात्र गुलदस्त्यात आहे. मागील निवडणुकीत शिवसेनेकडून नगरसेवक झालेल्या रिपाइंचे सुनील रोकडे आणि शशिकांत उबाळे यांना उपनगराध्यक्ष पदाची संधी शिवसेनेने देऊ केली होती. त्याची कृतज्ञता म्हणून रिपाइंचा एक गट सेनेला साथ देणार आहे. एकंदरीत या निवडणुकीत तोडफोडीचे राजकारण करा ही रणनीती सर्वच राजकीय पक्ष आखणार आहे. प्रथमच नगराध्यक्षपदाची निवड थेट होत असल्याने ही निवडणूक प्रतिष्ठेची होणार हे मात्र निश्चित. या निवडणुकीत भावली धरणातून शहराला पाणीपुरवठा करण्याचे श्रेय गाजणार आहे. भाजपाने आपल्यामुळे हा प्रश्न सुटला असा जाहीर गवगवा गेला असून, सत्ताधारी शिवसेना मात्र हा प्रश्न आम्हीच पाठपुरावा केल्याने मार्गी लावला, असे जाहीर करीत आहे. यामुळे न झालेल्यापाणीपुरवठा योजनेचे श्रेय लाटण्याचा प्रकार निवडणुकीआधी सुरू झाला आहे.
उमेदवारांच्या पक्षांतराने वाजले निवडणुकीचे बिगुल
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 27, 2017 12:19 AM